Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘फॅन’सोबत सुलतानचा टीजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:55 IST

गोष्ट फार जूनी नाही जेव्हा शाहरुख खान आणि सलमान खान एकमेकांचे तोंडदेखील पाहत नव्हते. एकाच रस्त्यांवर घर असूनही कधी ...

गोष्ट फार जूनी नाही जेव्हा शाहरुख खान आणि सलमान खान एकमेकांचे तोंडदेखील पाहत नव्हते. एकाच रस्त्यांवर घर असूनही कधी एका शब्दाने बोलायचे नाही. परंतु काळाबरोबर दोघांमधील वैमनस्य कमी झाले. आता तर दोघे असे वागतात जसे काय ‘लंगोटिया यार’ आहेत.दोघांचा दोस्ताना आता आणखी एक पाऊल पुढे गेलेला दिसतोय. एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाच्या वेळी सलमानच्या ‘सुलतान’चा टीजर दाखविण्यात येणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांना डबल बोनस मिळणार हे नक्की.}}}}‘सुलतान’ आणि शाहरुखचा ‘रईस’ ईदच्या मुहुर्तावर एकाच दिवशी रिलिज होणार होते. मात्र, एकमेकांच्या व्यावसायाचा विचार करून दोघांनी असे करण्याचे टाळले.