Suspense : ‘दत्त’मध्ये रणबीर कपूरची मान्यता कोण असेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 19:05 IST
संजय दत्तची बायोपिक पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र यावेळी रणबीर विषयीची चर्चा नसून, त्याची आॅनस्क्रीन पत्नीवरून चर्चा रंगली आहे. ...
Suspense : ‘दत्त’मध्ये रणबीर कपूरची मान्यता कोण असेल?
संजय दत्तची बायोपिक पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र यावेळी रणबीर विषयीची चर्चा नसून, त्याची आॅनस्क्रीन पत्नीवरून चर्चा रंगली आहे. वास्तविक चित्रपटाची शूटिंग सुरू झाली तेव्हापासूनच रणबीरच्या लुकवरून तो वेळोवेळी चर्चेत आला आहे. आता चर्चेत राहण्याची वेळ त्याच्या आॅनस्क्रीन पत्नीची असून, गेल्या काही दिवसांपासून, बायोपिकमध्ये मान्यताची भूमिका दिया मिर्झा साकारणार असल्याची अफवा पसरली आहे. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या मते, या चर्चा कोणी आणि कशा पसरविल्या याची मला काहीच माहिती नसून, मी फक्त याचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, मुकेशला या चर्चांविषयी काहीच माहिती नाही. मात्र माध्यमांमध्ये ही चर्चा जोरदार पसरविली जात आहे की, मान्यताच्या भूमिकेत दिया मिर्झाच झळकणार आहे. यावेळी मुकेशने स्पष्ट केले की, चित्रपटात दियाने तिच्या रोलची शूटिंग पूर्ण केली आहे. त्यामुळे दिया मान्यताच्या भूमिकेत दिसणार काय? याबाबत आता साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण चित्रपटाची शूटिंग अद्याप शिल्लक असून, दियाने मान्यताची भूमिका साकारली असती तर, तिला चित्रपटाच्या अखेरपर्यंत शूटिंगमध्ये व्यस्त ठेवले जाण्याची शक्यता होती. अशात मान्यताची भूमिका दिया साकारणार याविषयी आता शंका वाटत आहे. त्याचबरोबर आता मान्यताच्या भूमिकेत कोण दिसणार? हा प्रश्नही यानिमित्त निर्माण झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसनिमित्त रिलीज केला जाणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्याबरोबर मुकेश छाबरा दुसºया चित्रपटात काम करीत आहे. यापूर्वी त्याने आमिर खान स्टारर ‘पिके’मध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर ब्लॉक बस्टर ठरला होता. दरम्यान, या चित्रपटात दिया मिर्झा हिच्यासह सोनम कपूर, करिष्मा तन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. असे म्हटले जात आहे की, चित्रपटात माधुरी दीक्षित आणि संजूबाबाची लव्हस्टोरी दाखविली जाणार आहे. यावरून माधुरीने संजय दत्तला फोन करून चित्रपटात तिच्या नावाचा उल्लेख केला जाऊ नये याविषयी विनंती केल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने मी संजयला फोन केला नसल्याचे सांगितले होते. असे म्हटले जात आहे की, संजूबाबाच्या बायोपिकमध्ये माधुरीची भूमिका ठेवली जाण्याची शक्यता आहे. सोनम कपूर किंवा करिष्मा तन्ना ही भूमिका साकारण्याची शक्यता आहे, तर संजूबाबाच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री मनीषा कोईराला दिसणार आहे, तर वडिलांच्या भूमिकेत परेश रावल दिसणार आहेत.