Join us

सुष्मिता सेनमुळे बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या करणार होता ‘हा’ दिग्दर्शक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 15:46 IST

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला ग्लॅमर आणि बिनधास्त लूकसाठी ओळखले जाते. सुष्मिताने तिच्या करिअरमध्ये ‘मै हूं ना, बीबी नं. १, ...

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला ग्लॅमर आणि बिनधास्त लूकसाठी ओळखले जाते. सुष्मिताने तिच्या करिअरमध्ये ‘मै हूं ना, बीबी नं. १, सिर्फ तूम, चिंगारी, दस्तक’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारून स्वत:ला सिद्ध केले. १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविणारी सुष्मिता आजही तिच्या सौंदर्याचे जलवे दाखविताना दिसते. वास्तविक सुष्मिता जेवढी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत आली तेवढीच तिच्या अफेअरमुळेही ती सातत्याने लाइमलाइटमध्ये राहिली. विक्रम भट्ट यांच्याबरोबरचे तिचे अफेअर सर्वांत चर्चेत राहिले. एक काळ असा होता जेव्हा विक्रम भट्ट सुष्मिताच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले होते. विशेष म्हणजे जेव्हा त्यांना सुष्मितावर प्रेम जडले तेव्हा ते विवाहित होते. सुष्मितासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोटही दिला होता. एका मुलाखतीदरम्यान विक्रम भट्टने म्हटले होते की, ‘सुष्मिताबरोबरच्या अफेअरमुळे लहानपणीची मैत्रिण आणि पत्नी अदितीला घटस्फोट द्यावा लागला. वास्तविक मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हतो. परंतु परिस्थिती तशी उद्भवल्यामुळे मला हे कठोर पाऊल उचलावे लागले. विक्रम भट्ट यांच्या मते, ‘त्याकाळी मी खूपच डिप्रेशनमध्ये गेलो होतो. विक्रम भट्ट यांनी सुष्मिताबरोबरचे अफेअर त्यांच्या आयुष्यातील सगळ्यांत मोठी चूक असल्याचे मान्यही केले. शिवाय त्याचा त्यांना आजही पश्चाताप होतो. सुष्मिताबरोबरचे अफेअर आणि पत्नीला घटस्फोट दिल्याने त्यांना पुन्हा संसार थाटायची अजिबात इच्छा नाही. त्यामुळेच ते अजूनही एकाकी जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रम भट्टने सांगितले की, जेव्हा माझी पत्नी मला सोडून निघून गेली तेव्हा मी घराच्या बाल्कनीमधून उडी घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या पत्नीपेक्षा मी माझ्या मुलींना खूप मिस करीत होतो. पुढे मी माझ्या पत्नीशी चांगले संबंध निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यात मी अपयशी ठरल्याचेही विक्रमने सांगितले. दरम्यान, त्याकाळी विक्रम आणि सुष्मिताची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत होती.