Join us  

15 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेन लग्न करणार? रोहमनसोबतच्या नात्यावर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 11:42 AM

सुष्मिता सेन तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen)  ही 'आर्या' (Aarya Web Series) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुष्मिता तिच्या सीरिजचे जोरदार प्रमोशन करत आहे. यावेळी अनेकदा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ती दिसून आली आहे.  ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र आल्याने दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे अंदाज चाहते बांधत आहेत. आता यावर खुद्द सुष्मिता सेनने मौन सोडलं आहे. 

 सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेटल होण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली, 'किमान या टप्प्यावर आता मी सेटल होण्याचा विचार करावा अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे. पण, मला त्याची पर्वा नाही. असं नाही की मी कोणत्या नात्याचा सन्मान करत नाही. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. त्याप्रती आदर आणि प्रेमही आहे. पण सध्या माझी कोणतीही योजना नाही'. 

'आर्या दिग्दर्शक राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानी यांचं मी एक जोडपं म्हणून खूप कौतुक आहे. आतापर्यंत मला भेटलेल्या प्रभावशाली व्यक्तिंमध्ये मी त्यांची नावं घेईल. माझा मैत्रीवर खूप विश्वास आहे. मैत्री चांगली असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. तर इतर गोष्टीही आपोआप घडू शकतात आणि स्वातंत्र्य हे खूप महत्वाचे आहे'.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत. 2018 मध्ये रोहमनसोबत रिलेशनशिपची घोषणा केली होती. पण दोघेही २०२१ मध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर सुष्मिताचे नाव ललित मोदींसोबत जोडले गेले.  त्यांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघे लग्नही करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, ब्रेकअपच्या दोन वर्षांनंतर सुष्मिता आणि रोहमन पुन्हा एकदा एकत्र आले.  गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगल मदर म्हणून दोन मुलींचे संगोपन करत आहे. 

टॅग्स :सुश्मिता सेनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमालग्न