आठ वर्षांनंतर कमबॅकची तयारी करीत आहे सुष्मिता सेन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 21:53 IST
२०१० मध्ये ‘नो प्रोब्लम’ या चित्रपटात बघावयास मिळालेली माजी मिस युनिव्हर्स अभिनेत्री सुष्मिता सेन तब्बल आठ वर्षांनंतर कमबॅक करण्यास ...
आठ वर्षांनंतर कमबॅकची तयारी करीत आहे सुष्मिता सेन!!
२०१० मध्ये ‘नो प्रोब्लम’ या चित्रपटात बघावयास मिळालेली माजी मिस युनिव्हर्स अभिनेत्री सुष्मिता सेन तब्बल आठ वर्षांनंतर कमबॅक करण्यास सज्ज आहे. यासाठी ती गेल्या दीड वर्षांपासून चांगल्या पटकथेच्या शोधात आहे. याविषयी सुष्मिताने म्हटले की, गेल्या दीड वर्षांपासून मी चांगल्या पटकथेच्या शोधात आहे. सुष्मिता मुलगी अलिशासोबत गेल्या शुक्रवारी लहान मुलांच्या रूबल नागी कला फाउंडेशनमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित होती. यावेळी जेव्हा सुष्मिताला ‘तू कमबॅक केव्हा करणार?’ असे विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘मी गेल्या दीड वर्षांपासून चांगल्या पटकथेच्या शोधात आहे.’सुष्मिताने म्हटले की, ‘मला असे वाटते की, मी माझ्या आयुष्यातील सहा महिने एका चित्रपटाला देण्यास तयार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, माझ्या अनुरूप एक चांगली पटकथाही तयार आहे. त्यामुळे सध्या मी चांगल्या पटकथेच्या शोधात आहे.’ १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविणाºया सुष्मिताला मोठी स्टार बनण्याची अजिबातच महत्त्वाकांक्षा नाही. तिला फक्त तिच्या चाहत्यांमध्ये मिसळणे आवडते. पुढे बोलताना सुष्मिताने सांगितले की, ‘मी नेहमीच हे सांगत आली आहे की, लोकांमध्ये मिसळण्यासाठी मी नेहमीच कुठला ना कुठला मार्ग शोधत असते. खूप मोठी स्टार बनण्याचा माझी अजिबातच महत्त्वाकांक्षा नाही. खरं तर मी देवाचे आभार मानते की, त्यांनी मला एक अभिनेत्री बनण्याची संधी दिली. दरम्यान, मधल्या काळात सुष्मिताने एका बंगाली चित्रपटातही काम केले. आता तिच्या चाहत्यांना बॉलिवूडमध्ये तिचे जलवे बघायचे आहे.