Join us

पोस्टमार्टमनंतर आता समोर आला सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट, झाला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 11:32 IST

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 लोकांचा जबाब नोंदवले आहेत. या दरम्यान आता त्याचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला आहे.

सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की सुशांतच्या शरीरावर कोणतेही  संदिग्ध रसायन किंवा विष सापडले नाही. पोस्टमार्टमनंतर विसरासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणसाठी पाठवले होते.  

सुशांत सिंग राजपूतच्या विसरा रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचा नमूना मिळाले नाहीत. त्याच्या नखातही काहीच मिळाले नाही. सुशांतचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट मागील आठवड्यात आला होता. त्यात सांगितले होते की, सुशांतचे निधन गळफासामुळे श्वास कोंडल्यामुळे झाले होते. पोस्टमार्टम रिपोर्टला पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केले आहे. यापूर्वी प्रोव्हिजन पोस्टमार्टम रिपोर्टमध्येदेखील हेच सांगितले होते की सुशांतचा मृत्यू फासामुळे श्वास कोंडून झाला होता.

मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहे. या प्रकरणी त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील त्याची सहकलाकार संजना सांघीचाही जबाब नुकताच नोंदवण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 28 लोकांचा जबाब नोंदवला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 28 लोकांचे स्टेटमेंट घेतले आहेत. त्यात त्याच्या कुटुंबातील लोक, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा, यशराज फिल्म्सचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा यांचा समावेश आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती