Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग रजपूतने त्याच्या आणि क्रिती सॅननच्या नात्याविषयी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 13:05 IST

सुशांत सिंग रजपूतने बालाजी टेलिफ्लिम्सच्या पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी ...

सुशांत सिंग रजपूतने बालाजी टेलिफ्लिम्सच्या पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच या मालिकेतील त्याच्या आणि अंकिता लोखंडेच्या जोडीचीदेखील चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकेद्वारे एकता कपूरने त्याला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक दिला होता. या पहिल्याच मालिकेद्वारे सुशांत स्टार बनला. या मालिकेनंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या.मोठ्या पडद्यावर सुशांतला अभिषेक कपूरने पहिली संधी दिली. अभिषेक कपूरच्या काय पो छे या चित्रपटात सुशांत प्रमुख भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर सुशांतने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने पी.के., एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.सुशांतने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यामुळे अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात. सुशांतच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच नेहमीच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. पवित्र रिश्ता या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत त्याची जोडी जमली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. सुशांत बॉलिवूडमध्ये यशाच्या पायऱ्या चढत असताना देखील अंकिताने त्याला साथ दिली होती. पण काहीच काळात त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्या ब्रेकअपसाठी क्रिती सॅनन कारणीभूत असल्याची चांगलीच चर्चा त्यावेळी रंगली होती. सध्या क्रिती सॅनन आणि सुशांत नात्यात असल्याचे देखील म्हटले जाते. पण सुशांतने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण सुशांतने पहिल्यांदाच त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. सुशांत कोणासोबतही नात्यात नसून तो सध्या सिंगल असल्याचे त्याने नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.Also Read : क्रिती सॅननने खरेदी केली ८० लाखाची अलिशान कार; एक चित्रपटासाठी स्विकारते इतके कोटी!