Join us

सुशांत सिंग राजपूत करणार 'नासावारी'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:37 IST

सध्या सुशांत सिंग राजपूत खऱ्या अर्थाने चंद्रावर आहे कारण त्याच्या अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ...

सध्या सुशांत सिंग राजपूत खऱ्या अर्थाने चंद्रावर आहे कारण त्याच्या अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागून एक रिलीज होणार आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिती सॅनन सोबतचा रिलीज झालेला राब्ता हा चित्रपट फारसा काही कमाल दाखवू शकला नाही. सध्या सुशांतचा चंदा मामा दूर के हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंग चौहान करतोय.   एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार सुशांत चंदा मामा दूर के या चित्रपटाच्या तयारासाठी तो नासाला जाणार आहे. नासाला जाण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. नासाला जाणार म्हणून हल्ली मला रात्री झोप नाही लागत. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांचा ज्ञान मला आहे पण पहिल्यांदा याच प्रॉक्टिकल नॉलेज मला घेता येणार आहे. यात तो एका अंतराळवीराची भूमिका साकारत आहे. चंदा मामा दूर के मध्ये त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर माधवनसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चंदा मामा दूर के हा एक अंतरिक्ष साहसी चित्रपट आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट दिशा पटानी ही दिसणार असल्याची चर्चा आहे. सुशांत श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नींडिससोबत ड्राइव्हवर जाणार आहे. असे गोंधळून जाऊ नका त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ड्राइव्ह आहे. जॅकलिन आणि सुशांतची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे