Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानसह कधीच काम करणार नाही हा प्रसिद्ध अभिनेता, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 16:53 IST

सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. सुशांत सिंह राजपूतसह तिने बॉलिवूडमधील पहिला डेब्यू केला होता.

छोटे नवाब सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. सुशांत सिंह राजपूतसह तिने बॉलिवूडमधील पहिला डेब्यू केला होता. या चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र आता असं समजतंय की सुशांतने सारासोबत काम करण्यास नकार दिला आहे. सुशांतच्या निर्णयामागे अमृता सिंह जबाबदार आहेत. 

केदारनाथ' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत सिंग राजपूत व सारा अली खान यांचे अफेयर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यानंतर अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली होती . या दोघांच्या नात्यांवर अशाप्रकारे संशय घेणे सुशांतला चांगलेच खटकल्याचे दिसतंय. त्यामुळे सुशांत आणि सारा यांच्यात कटुता निर्माण झाली आहे.  दोघांमध्ये आता मैत्रीचे देखील बंध उरले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला  होता. स्वाभिमान महत्त्वाचा असून तो सुशांतने टिकवला आहे. त्यामुळे सारासह काम न करण्याचा निर्णय किती दिवस पाळला जाणार हे ही पाहणे रंजक असणार आहे.  

तर दुसरीकडे सुशांत  नात्यात असल्याच्या चर्चा आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सुशांत नात्यात असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि डिनरला जाताना पाहण्यात आलं आहे. तर साराचंही कार्तिक आर्यनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.

सारा अली खानचा इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आजकल' सिनेमा फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला. या सिनेमात तिनं कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानसुशांत सिंग रजपूतअमृता सिंग