Join us  

बॉलिवूडचे अनेक टॉप अ‍ॅक्टर्स ड्रग्ज अ‍ॅडिक्ट, ड्रग्जमुळेच मिळते काम...! सुशांतचा मित्र युवराजचे धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 11:48 AM

कोकेनचा होतो खुल्लमखुल्ला वापर...

ठळक मुद्देबॉलिवूडचे असे 5-8 कलाकार आहेत, ज्यांना ड्रग्ज सोडण्याची गरज आहे. असे न केल्यास ड्रग्ज त्यांचा जीव घेईन. बॉलिवूडचे टॉपचे 10 ते 15 कलाकार ड्रग्ज अ‍ॅडिक्ट आहेत, असा दावा युवराजने केला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर इंडस्ट्रीत नवनवे खुलासे होत आहेत. आता सुशांतचा जवळचा मित्र आणि निर्माता युवराज एस. सिंग डस्ट्रीबद्दल नवे खुलासे केले आहेत. बॉलिवूड बहुतांश बडे कलाकार कोकीनचे व्यसनी असल्याचा खुलासा युवराजने केला आहे. 70 च्या दशकापासूनच इंडस्ट्रीत ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. अर्थात तो काळ वेगळा होता. आता सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, असे युवराज म्हणाला.

कोकेनचा होतो खुल्लमखुल्ला वापरबॉलिवूडमध्ये सर्वाधिक कोकेनचा वापर होतो, असा दावाही युवराजने केला. बॉलिवूडचे खूप सारे लोक कोकेन घेतात. यात अनेक कलाकार व दिग्दर्शकांचा समावेश आहे. गांजा हा तर इतका कॉमन आहे की, तो सिगरेटसारखा ओढला जातो. कॅमेरापर्सनपासून टेक्निशिअनपर्यंत सेटवरचे लोक सर्रास गांजाचे सेवन करतात. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्वाधिक कोकेन चालते. कोकेन हेच बॉलिवूडचे मेन ड्रग्ज आहे. याशिवाय एमडीएमए आणि एलएसडीचाही वापर होतो. याशिवाय केटामाइन, जे सर्वाधिक हार्ड ड्रग्ज आहे, त्याचाही वापर होतो. केटामाइनचा प्रभाव 15 ते 20 तास राहतो, असे युवराजने सांगितले.

नाही तर ते मरतील...बॉलिवूडचे असे 5-8 कलाकार आहेत, ज्यांना ड्रग्ज सोडण्याची गरज आहे. असे न केल्यास ड्रग्ज त्यांचा जीव घेईन. बॉलिवूडचे टॉपचे 10 ते 15 कलाकार ड्रग्ज अ‍ॅडिक्ट आहेत, असा दावा युवराजने केला. मात्र या कलाकारांच्या नावाचा खुलासा करण्यास त्याने नकार दिला. मी त्यांची नावे सांगितली तर ते माझा बदला घेतील. शिवाय हे लोक ड्रग्ज अ‍ॅडिक्ट आहेत, हे सिद्ध करणारे कुठलेही पुरावे सध्या माझ्याजवळ नाहीत,असेही युवराज म्हणाला. या ए लिस्ट गँगने एक लॉबी बनवली आहे. तुम्हाला या लॉबीसोबतच काम करावे लागेल, दुसरा कुठलाही पर्याय नाही. ही लॉबी त्यांच्या सर्कलमधील लोकांनाच पुढे नेतात, नेपोटिजमला चालना देतात, असेही युवराजने सांगितले.

बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव!

भुसभुशीत स्पर्धा, पार्ट्या, ड्रग्ज आणि स्वैराचार यांनी घेरलेल्या बॉलीवुडच्या पोकळ डोलार्‍याची कहाणी

ड्रग्जमुळेच मिळते कामयुवराजने पुढे सांगितले की, मलाही अनेकदा ड्रग्ज आॅफर केले गेले. अनेकांना तर ड्रग्जमुळेच काम मिळते. हिरो, हिरोईन वा दिग्दर्शकासोबत ड्रग्ज घेतल्याने संपर्क वाढतो, असा बॉलिवूडचा माइंडसेट आहे. काही लोकांनी येथे असे काही वातावरण निर्माण केले आहे की, सगळे याच सर्कलमध्ये काम करू इच्छितात.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड