Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता याची कल्पना नव्हती, सुशांत सिंगच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 12:44 IST

सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला. त्याच्या निधनानंतर बॉलिवूड व त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता अशी माहितीसमोर येते आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशांतने औषधे घेणे थांबवले होते. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांनी सोमवारी पाटणावरुन येऊन मुलाचे मुंबईत अंतिम संस्कार केले. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांचे विधान समोर आले आहे. रिपोर्टनुसार पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये  वडिलांनी सांगितले आहे की त्यांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती की सुशांत डिप्रेशनमध्ये आहे. पण त्यांनी सांगितले की काही काळपासून सुशांत खचलेला दिसत होता.  

सुशांत सिंग राजपूत जगातून गेला पण जातांना अनेक प्रश्न मागे सोडून गेला. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी पडला, असे आता अनेकजण उघडपणे बोलत आहेत. तूर्तास याला काहीही आधार नाही. मात्र सोशल मीडियावर यानिमित्ताने काही लोकांवर उघडउघड आरोप होत आहेत. करण जोहर व त्याची गँग तर प्रचंड ट्रोल होतेय. करण जोहर व त्याच्या गँगने सुशांत सारख्या अनेकांना बॉलिवूडमध्ये मोठे होऊ दिले नाही, त्यांना काम मिळू नयेत म्हणून प्रयत्न केलेत, असे एक ना अनेक आरोप ऐकायला मिळत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत