सुशांत सिंग राजपूतने का डिलिट केल्या सर्व सोशल पोस्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 17:51 IST
सुशांत सिंग राजपूत सध्या सारा अली खानसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात बिझी आहे. अशातचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टबद्दल एक इंटरेस्टिंग ...
सुशांत सिंग राजपूतने का डिलिट केल्या सर्व सोशल पोस्ट?
सुशांत सिंग राजपूत सध्या सारा अली खानसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात बिझी आहे. अशातचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह राहणारा सुशांत रोज आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत होता. पण अलीकडे अचानक त्याने हे बंद केले होते व त्याऐवजी तो अतिशय धीरगंभीर पोस्ट करू लागला होता. फिजिक्स आणि एस्ट्रो फिजिक्ससारख्या विषयांवर तो पोस्ट करू लागला होता. त्याच्या या पोस्ट चाहत्यांच्या आकलनापलिकडच्या होत्या. आता पुन्हा एकदा सुशांतने आपल्या सोशल मीडिया पोस्टचा ‘टोन’ बदलला आहे. होय, आपल्या सर्व जुन्या पोस्ट डिलिट करून तो पुन्हा पूर्वपदावर आलाय. म्हणजे पुन्हा एकदा पूर्वीसारख्या हलक्या फुलक्या दैनंदिन आयुष्यातील पोस्ट करू लागलाय. इन्स्टावर त्याने आपले १० ते १२ नवे फोटो शेअर केले आहेत. सुशांतच्या या विचित्र व्यवहाराने चाहत्यांना मात्र वेगळेवेगळे प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे सुशांतने दिलीत तर बरेच होईल.ALSO READ : क्रिती सॅननला मिळाली नवी कंपनी, काय करणार आता सुशांत सिंग राजपूतसुशांतने त्याचे अभिनयातील करिअर टीव्ही सिरीयल ‘पवित्र रिश्ता’ने सुरू केले. पाहता पाहता ही मालिका आणि सुशांत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. पण एवढ्यावर त्याचे समाधान होणार नव्हते. सर्वोच्च ‘टीआरपी’ असताना त्याने सिरीयल सोडली आणि मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न गाठण्यासाठी तो निघाला.बऱ्याच जणांना त्याचा हा निर्णय ‘मुर्खपणा’चा वाटला. छोट्या पडद्यावर एवढी लोकप्रियता मिळवल्यावर चित्रपटांमध्ये त्या चेहऱ्याला प्रेक्षक स्वीकारत नाही अशी सर्वसाधरण धारणा आहे. पण यामुळे त्याचा आत्मविश्वास काही कमी झाला नाही. तो जिद्दीने मेहनत करू लागला. ‘काय पो चे’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. तेव्हापासून त्याने मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित सिनेमात काम करून त्याने करिअर बेस्ट परफॉर्मन्स दिला. सोलो हीरो म्हणून त्याचा हा पहिला शंभर कोटी कमवणारा चित्रपट ठरला.