Join us

​सुशांत सिंग रजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस जाणार 'डाइव्ह'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 14:21 IST

एम एस धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे सध्या सुशांत सिंग रजपूत यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. या चित्रपटाने बॉक्स ...

एम एस धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे सध्या सुशांत सिंग रजपूत यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. तसेच या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. या चित्रपटानंतर सुशांतकडून आता सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच सुशांतच्या आगामी चित्रपटाबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. एम एस धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटानंतर तो सध्या राबता या चित्रपटावर काम करत आहे. राबता या चित्रपटासोबतच चंदा मामा दूर के या चित्रपटाच्या पटकथेवर आणि त्याच्या व्यक्तिरेखेवरदेखील त्याचे काम सुरू आहे.राबता या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर सुशांत ड्राइव्ह या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस त्याच्यासोबत झळकणार आहे. जॅकलिन आणि सुशांतची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडला जॅकलिन आणि सुशांत ही नवी जोडी मिळणार आहे. डाइव्ह या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहे. तरुणने जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या दोस्ताना या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोस्ताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. करण जोहरने दोस्ताना या चित्रपटाची निर्माती केली होती आणि विशेष म्हणजे सुशांतच्या या आगामी चित्रपटाचा निर्मिता देखील करण जोहरच असणार आहे. तसेच तरुण तब्बल आठ वर्षांनंतर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर तरुण परतत असल्याने तो या चित्रपटावर खूप मेहनत घेत आहे. डाइव्ह या चित्रपटाची कथा ही ऐंशीच्या दशकातील असून या चित्रपटात प्रेक्षकांना जॅज म्युझिकचा आस्वाद घ्यायला मिळणार असल्याची चर्चा आहे.