Join us

सारा अली खानसोबत सुशांतने पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा हेवी डोस, रियाचा NCBसमोर खुलासा

By गीतांजली | Updated: September 21, 2020 15:39 IST

एनसीबीच्या चौकशीत रियाने सुशांतचे घर सोडण्यामागचे कारण सांगितले.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीने एक मोठे वक्तव्य केले आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने सुशांतचे घर सोडण्यामागचे कारण सांगितले. 8 जून रोजी रियाने सुशांतचे घर का सोडले हे त्याच्या कबुलीजबाबातून उघड झाले.

आज तकच्या रिपोर्टनुसार, एनसीबीला दिलेल्या जबाबात रिया म्हणाली की, सुशांत ड्रग्सच्या व्यसनी गेला होता आणि त्याला त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले होते. हे सांगून रियाने सुशांतचे घर सोडले होते. लॉकडाऊन आणि सुशांतवर लागलेले मीटूचे आरोप लक्षात घेते त्याच्यासोबत राहिले तर आपलं करिअर खराब होईल. हा विचार करुन तिने सुशांतला सोडून देणं योग्य समझले.  

केदारनाथानंतर सुशांतच्या ड्रगचा वापर वाढलाआज तकच्या रिपोर्टनुसार, रियाने एनसीबीला सांगितले की, केदरानथान सिनेमानंतर सुशांतने ड्रग्सचा डोस वाढवला. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांत केदारनाथ चित्रपटाच्या आधीपासून ड्रग्स घ्यायचा. केदरानथाच्या आधी तो ड्रग्स घ्यायचा पण फारच मर्यादित. सुशांत जेव्हा या चित्रपटसृष्टीत आला, तेव्हापासून त्याचे सर्कल सुपर पार्टी कल्चर बनू लागले, जिथे तो ड्रग्ज घेत होता  पण त्याच्या व्यसनाधीन झाले नाही. रियाने सांगितले कि सुशांत क्यूरेटेड मर‍िजुआनाचे  10-20 डोप्स घ्यायचा आणि तो एक प्रकारे त्यावर अवलंबून होतो.

रियाचे ड्रग्स रॅकेटशी संबंधएबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी मुलाखतीमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे केले. एनसीबी प्रमुख म्हणाले की, ड्रग्स रॅकेटशी रियाचा जवळचा संबंध आहे आणि त्यांच्या मूळपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ड्रग्स रॅकेटचा आंतरराष्ट्रीय संबंध मुलाखतीत ते म्हणाले, रिया चक्रवर्ती ड्रग्सचा छोटा सिंडिकेट नाही आहे.त्याचे म्हणणे आहे की, या प्रकरणामुळे एक मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस आले आहे ज्याचे दुबई आणि दहशतवादी गटांशी आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रग्स रेव्ह पार्टीसाठी आणले जाते आणि या पैशांचा वापर नार्को-टेररसाठी केला जातो..

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीसारा अली खान