सर्जिकल स्ट्राईकचा खुलासा अन् अक्षयची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 12:04 IST
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा राग अनावर झाला असून सर्जिकल स्ट्राईकचा खुलासा मागणाºयांना अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चांगलीच चपराक लगावली आहे.
सर्जिकल स्ट्राईकचा खुलासा अन् अक्षयची चपराक
उरी येथील भारतीय सैन्य छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध देशात रोष निर्माण झाला. भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक करून चोख प्रतिउत्तर दिले. या सर्जिकल स्ट्राईकवरूनही वाद सुरू झाला आहे. यामुळे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा राग अनावर झाला असून सर्जिकल स्ट्राईकचा खुलासा मागणाºयांना अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चांगलीच चरपाक लगावली आहे. या व्हिडीओमधून त्याने आपली नाराजी जाहीर केली आहे. तो म्हणतो, ‘‘मी बॉलिवूड स्टार म्हणून नव्हे तर एका सैनिकाचा मुलगा म्हणून तुमच्याशी आपल्या भावना शेअर करीत आहे. मागील काही दिवसांत आपण आपसांतच चर्चा करीत आहोत. काही लोक सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे तर कुणी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी यावी अशी मागणी करतोय. कुणाला युद्धाची भिती वाटतेय. हे काय चालले आहे. आपल्याला अशी चर्चा करताना लाज वाटायला हवी, आपल्या सैनिकांनी सीमेवर बलिदान दिले आहे. आपल्या सैनिकांमुळे आपण येथे आहोत, त्यांना आपल्या भविष्याची व देशाची चिंता आहे.’’अक्षय कुमारने केलेले हे भावनिक आवाहन त्याच्यातील देशभक्तीची जाणीव करून देण्यासाठी पुरेसे आहे. तुम्हीच पहा काय म्हणतो अक्षयhttp://{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/akshaykumarofficial/videos/10154273500968283/">