अहिलसोबत सल्लूमियाँचा क्वालिटी टाइम...
सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा या दोघांचा मुलगा म्हणजे अहिल शर्मा. सलमान खानला त्याचा भाचा अहिल सोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतं. अर्पिता गरोदर असल्यापासून सलमान तिची काळजी घेत असायचा. अर्पिताची डिलीव्हरी होत असताना सलमान काश्मिरमध्ये चित्रपटाची शूटिंग करत होता. तिला जेव्हा कळालं की, मुलगा झाला आहे तेव्हा तो शूटिंगमधून वेळ काढून तिला भेटण्यासाठी आला.
चित्रपटाच्या सेटवर शाळेच्या लहान मुलांसोबत भाईजान...
सलमान खान कुठेही गेला तरी तो लहान मुलांसोबत रमलेला आपल्याला दिसतो. त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सुल्तान’ चित्रपटाच्या सेटवर तो काही शाळांच्या मुलांसोबत बोलताना दिसला. त्याने हाच फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.
‘ट्यूबलाईट’चा को-स्टार मॅटिन रे तंगू या चीनी मुलासोबत भाई...
सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फार काही विशेष कमाई क रू शकला नाही. पण, तो गॉसिपमुळे चर्चेत आला. यात सलमानने त्याचा छोटा सहकारी मॅटिन रे तंगूसोबत बरेचसे फोटो काढले. छोट्या मुलाच्या भूमिकेसाठी त्याची १००० लहान मुलांमधून निवड करण्यात आली होती. सलमानने त्याच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
बालदिनाच्या दिवशी मुलांसोबत सल्लूमियाँ...
सलमान खान हा असा अभिनेता आहे ज्याच्यावर सर्व स्तरांतील फॅन्स प्रेम करतात. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तो लहान मुलांसोबत मस्त धम्माल करताना दिसतो आहे. त्यासोबतच एका फोटोत तो काश्मिरी मुलांसोबतही दिसतो आहे. शूटिंगदरम्यान त्याला जसा वेळ मिळाला तसा तो त्यांच्यासोबत गप्पा-टप्पा मारतो.