निश्चितपणे हा सीन चित्रपटाचा लीड हिरो प्रभासवर चित्रीत करण्यात येणार आहे. सध्या या सीन्ससाठी प्रभास तयारी करत असल्याचे कळतेय. होय, या एका सीनसाठी म्हणे, प्रभासने खास डिप सी ड्रायव्हिंग शिकलेय. ‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर प्रभास अमेरिकेत सुट्टीवर गेला होता, हे तुम्हाला आठवत असेलच. याठिकाणी प्रभासने स्कुबा ड्रायव्हिंगचे धडे घेतल्याचे कळतेयं.
तसेही प्रभास एक समर्पित कलाकार आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो जीवापाड मेहनत घेतो. प्रत्येक सीन परफेक्ट असावा, हा त्याचा अट्टाहास असतो. त्यामुळे ‘साहो’मधील हा अंडरवॉटर सीनही एकदम परफेक्ट व्हावा, असे प्रभासचे मत होते आणि त्याचमुळे या एका सीनसाठी प्रभासने म्हणे स्कुबा ड्रायव्हिंग शिकले. एकंदर काय तर प्रभास पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना इंम्प्रेस करणार, हे निश्चित. अलीकडे हैदराबादेत या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल शूट झालेत. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट श्रद्धा कपूर हिची वर्णी लागली आहे. पुढील महिन्यांत श्रद्धा ‘साहो’च्या टीमला जॉईन करेल, असे समजतेय.
ALSO READ : प्रभासची हिरोईन बनण्यासाठी श्रद्धा कपूरला करावे लागणार ‘हे’ काम!