Join us

सनीचा छंद आगळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 12:14 IST

‘ग्लॅमडॉल’ सनी लिओनीचा बॉलिवूडमध्ये आता चांगलाच जम बसलाय. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, सनी एक चांगली अभिनेत्री तर ...

‘ग्लॅमडॉल’ सनी लिओनीचा बॉलिवूडमध्ये आता चांगलाच जम बसलाय. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, सनी एक चांगली अभिनेत्री तर आहे, त्याशिवाय ती एक चांगली आर्टिस्टही आहे. होय, सनीला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. पेन्टिंग तिचा जीव की प्राण आहे. सनीला तिची आई कायमची सोडून गेली आणि सनी एकाकी पडली. या काळात या छंदाने सनीला सावरले. आई सोडून गेल्यानंतर सनी रात्र-रात्र भर जागून निव्वळ पेन्टिंग बनवायची. आईच्या निधनानंतर सनी मनातून खचली होती. आईचा विरह तिला असह्य झाला होता. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी पेन्टिंगच्या छंदाने तिची मोठी मदत केली. आत्तापर्यंत सनीने सुमारे १८ सुंदर पेन्टिंग बनवल्या आहेत.