गतवर्षी सनी लिओनी ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत अरबाज खान मुख्य भूमिकेत दिसला होता. अर्थात सनीच्या या चित्रपट बॉक्स आॅफिस दणकून आपटला होता. त्यापूर्वी शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातील आयटम सॉँगमध्ये ती झळकली होती.
सध्या सनी आपल्या इमेज मेकओव्हरमध्ये लागलीय. ‘पॉर्न स्टार’ ही इमेज सनीला पुसून काढायची आहे. बॉलिवूडमध्ये सनीला आत्तापर्यंत बोल्ड भूमिकाच मिळाल्या. त्यामुळे अलीकडे सनीने साऊथकडे मोर्चा वळवला आहे. साऊथमध्ये एक पीरियड ड्रामा फिल्म सनीने साईन केली आहे. यात सनी अॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यासही सनी उत्सुक आहे. माधुरी दीक्षित, कंगना राणौत, विद्या बालन अशा बड्या अभिनेत्रींनी या बायोपिकसाठी नकार दिला असतानाच सनीने मात्र यात इंटरेस्ट दाखवला आहे. अर्थात तूर्तास दिग्दर्शकांनी या बायोपिकसाठी सनीचे नाव फायनल केलेले नाही. या व अशा चित्रपटामुळे तरी आपली इमेज बदलेल, असा सनीचा कयास आहे. आता या प्रयत्नांत सनीला किती यश मिळते, ते बघूच.
ALSO READ : OMG : ‘या’ कारणाने आठवडाभर झोपू शकली नव्हती सनी लिओनी !