सनीने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शपथ घेऊन सांगते मी हाथ आवरता घेतला नाहीतर सर्व विटांचा खच जमनीवर पडला असता... सनी लिओन... ढाई किलो का हाथ.’ सनीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. सनीने हा फोटो शेअर करताच काही वेळातच त्यास असंख्य लाइक्स मिळाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, सनी लिओनीचा मेणाचा पुतळा लवकरच दिल्ली येथील मॅडम तुसाद संग्रहालयात बसविण्यात येणार आहे. जेव्हा ही बातमी सनीला कळाली तेव्हा ती चांगलीच उत्साहित झाली होती. सध्या सनी तिची इमेज बदलण्याचा प्रयत्न करीत असून, त्यासाठी तिने साउथ इंडस्ट्रीत आपला मोर्चा वळविला आहे. ‘वीरमादेवी’ या चित्रपटात ती जबरदस्त अंदाजात बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट तामिळ व्यतिरिक्त अन्य भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात ती वीरमादेवीची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. या चित्रपटाला ऐतिहासिक टच देण्यात आला असून, त्यामध्ये तुफान अॅक्शन बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन वीसी वैदियुदैयान करीत असून, पोंस स्टेफिन निर्माता आहेत.