जॉन अब्राहमच्या 'शूटआउट अॅट वडाला' चित्रपटात 'लैला' हे आयटम साँग केलेली सनी आता ह्रतिक रोशनच्या 'काबिल' चित्रपटातही हॉट आयटम साँग करणार आहे. ह्रतिकचे वडील राकेश रोशन मुलाला घेऊन दोन चित्रपट बनवणार आहेत.यापैकी एक चित्रपट ते स्वतः दिग्दर्शित करणार आहेत तर दुसरा चित्रपट संजय गुप्ता दिग्दर्शन करणार आहे. संजय गुप्ताच्या 'काबिल' चित्रपटाचे काम पहिल्यांदा सुरू होईल. यात सनी लिओनचे ह्रतिकसोबत आयटम साँग असेल.
ह्रतिकसोबत रोमान्स करणार सनी लिओन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:33 IST