Join us

​सनी लिओनीला पडला आहे ‘हा’ एकच प्रश्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 15:06 IST

अभिनेत्री सनी लिओनी लवकरच शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात ‘लैला मैं लैला...’ या आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. पण ...

अभिनेत्री सनी लिओनी लवकरच शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात ‘लैला मैं लैला...’ या आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे. पण सनीला विचाराल तर ‘आयटम नंबर्स’ ही संकल्पना तिला फारशी रूचलेली नाही. एखाद्या गाण्याला आयटम नंबर असे का संबोधले जाते, हा प्रश्न सनीला पडला आहे. प्रत्येक गाणे त्या त्या चित्रपटाचा भाग असते. चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी कथेशी अनुरूप अशी काही गाणी टाकली जातात. अशास्थितीत चित्रपटाचा भाग असलेल्या काही विशिष्ट गाण्यांना आयटम नंबर का संबोधले जाते, हे मला कळत नाही. अगदी सुरुवातीपासून अशीच काही गाणी बॉलिवूडपटांचा भाग राहिली आहेत आणि लोकांना ती आवडली आहेत. मग या गाण्यांसाठी आयटम नंबर हा शब्द का? असा सवाल सनीने केला आहे.कुठलेही गाणे वाईट किंवा विभत्स असे मी मानत नाही. मी बॉलिवूडमध्ये नव्हते तेव्हापासून माझे हेच मत आहे. आयटम सॉंगची संकल्पना मला अद्यापही कळलेली नाही. गाण्यांमध्ये काही वाईट असते, असे मला अजिबात वाटत नाही, असेही तिने स्पष्ट केले.शाहरूख खानच्या चित्रपटांत काम करण्याचे माझे स्वप्न होते आणि माझे हे स्वप्न पूर्ण झाले. त्याच्या चित्रपटातील एका गाण्यात मी दिसणार आहे, यातच माझ्यासाठी सगळे काही आले. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव अद्भूत होता.‘लैला मैं लैला...’ या गाण्याची प्रेक्षकांइतकीच मी सुद्धा आतुरतेने प्रतीक्षा करतेय, असे ती म्हणाली.  ‘रईस’ या चित्रपटात ऐंशीच्या दशकातील कथानक आहे. यात शाहरुख दारू माफिया रईस आलमची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे.