सनी लिओनच्या विधानसभा उमेदवारीचे पोस्टर; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 20:58 IST
सध्या सनी लिओनचा एक फोटो सोशल मीडियात व बातम्यांत चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोवर चक्क सनी लिओन उत्तरप्रदेशातील ...
सनी लिओनच्या विधानसभा उमेदवारीचे पोस्टर; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
सध्या सनी लिओनचा एक फोटो सोशल मीडियात व बातम्यांत चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोवर चक्क सनी लिओन उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथून आमदारकीची उमेदवार असून तिला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे. हा फोटो फोटोशॉपवर अॅडिट करून कुणीतरी पोस्ट केला असल्याचे सांगण्यात येते. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मनिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. यासाठी राजकीय पक्षांनी चांगलीच तयारी केली आहे. प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. अशातच मुरादाबाद मतदारसंघात लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टरमध्ये सनी लिओनचा फोटो लावण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. हा फोटो कुणीतरी गंमत करण्याच्या हेतूने लावण्यात आला आहे. मात्र सोशल मीडियाहून यावर चांगल्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या फोटोवर प्रतिक्रिया देताना काहींनी हा फोटोशॉपच्या माध्यमातून एडिट केला आहेत असे सांगितले तर कुणी हा फोटो लावणाºयावर कायदेशीर कार्यवाही करावी असे मत प्रकट केले आहे. मात्र अनेकांनी या फोटोवर सनी लिओनने निवडणूक लढविली तर आम्ही तिला मते देऊ असे मत व्यक्त केले आहे. सोबतच आम्ही सनीचा प्रचार करू अशीही तयारी दर्शविली आहे. राजकारणाचा व सनी लिओनीचा संबध नसला तरी मुरादाबादमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. या भागातील वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यानुसार या फोटोची चांगलीच चर्चा करण्यात येत आहे. विचार करा जर खरोखरच सनीने निवडणूक लढविली तर काय होईल.