Join us

सनी लिओनीला आहे ही विचित्र सवय, दर पंधरा मिनिटाला करते हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 15:19 IST

सनीचा भूतकाळ, तिचे कुटुंब,तिचा प्रवास याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सनीच्या एका सवयीविषयी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

ठळक मुद्दे सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे.

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते.  तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच  तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. याचमुळे गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणा-या अभिनेत्रींमध्ये सनीचे नाव आहे.सनीचा भूतकाळ, तिचे कुटुंब,तिचा प्रवास याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सनीच्या एका सवयीविषयी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. याला सवय म्हणा वा आजार. पण सनी दर 15 मिनिटांनी हे काम करते.

तिची ही विचित्र सवय कळली तेव्हा अनेकांना त्यावर विश्वास  बसला नाही. पण ‘जिस्म 2’च्या शूटींगदरम्यान सनी लिओनीने हा खुलासा केला होता. या विचित्र सवयीमुळे सनीला अनेकदा शूटींगसाठी उशीर होतो. आता ही विचित्र सवय कुठली तर सनी दर 15 मिनिटांनी पाय धुते. पाय धुतल्याशिवाय तिला चैन पडत नाही.

काहींना मिनिटा मिनिटाला हात धुण्याची सवय असते. तसेच सनीला दर 15 मिनिटांला पाय धुण्याची सवय आहे. या सवयीच्या ती एवढी आहारी गेलीय की, याच कारणामुळे तिला सेटवर पोहोचायला उशीर होतो.

 सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे. ‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. याशिवाय आणखी एक काम सनीने हाती घेतले आहे. ते म्हणजे,बच्चेकंपनीसाठीची शाळा. होय, सनी व तिचा पती डेनियल वीबर लवकरच एक शाळा उघडणार आहेत.

टॅग्स :सनी लिओनी