Join us

​‘लैला ओ लैला’ गाण्यावर सनी लिओनने केला सहा वेळा डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 21:03 IST

sunny lione live performs: six times once more on laila mai laila ; प्रेक्षकांना हे गाणे इतके आवडले की वन्स मोअरचा नारा त्यांनी दिला. खरेतर सनीने अनेक गाण्यांवर परफॉर्म करण्याची तयारी केली होती. परंतु ‘लैला मैं लैला’ या गाण्याची मोहनी सनीने अशी घातली की तिला यावर सहा वेळा या नाचावे लागले.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या ‘रईस’ या चित्रपटातील ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर लाईव्ह परर्फामन्स करण्यासाठी सनी लिओनला ४ कोटीची आॅफर मिळल्याच्या चर्चा मध्यंतरी आल्या होत्या. मात्र हे गाणे रिलीज करण्यात आल्याने या चर्चांना विराम मिळाला. मात्र सनीने या गाण्यावर कोलकाता येथे लाईव्ह परर्फामन्स दिल्याच्या बातम्या येत आहेत. ऐवढेच नव्हे तर या गाण्यावर सनी लिओनला सहा वेळा वन्स मोर मिळाला. यामुळे सनीला सहा वेळा डान्स करावा लागला. ‘रईस’ या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटातील गाणी रिलीज करण्यात आली आहेत. या चित्रपटातील आयटन नंबर ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर सनी लिओन ने केलेला डान्स चाहत्यांना चांगलाच पसंत पडतो आहे. या गाण्याचे लाईव्ह परर्फामन्स सनी लिओनने केले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सनी लिओन कोलकात्याच्या अम्यूजमेंट पार्कमध्ये परफॉर्म करीत होती. आगामी ‘रईस’ या चित्रपटातील ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर ती थिरकताना दिसली. आपल्या जबरदस्त घायाळ करणाºया अदानी सनीने उपस्थितांना धुंद केले. प्रेक्षकांना हे गाणे इतके आवडले की वन्स मोअरचा नारा त्यांनी दिला. खरेतर सनीने अनेक गाण्यांवर परफॉर्म करण्याची तयारी केली होती. परंतु ‘लैला मैं लैला’ या गाण्याची मोहनी सनीने  अशी घातली की तिला यावर सहा वेळा या नाचावे लागले. ‘लैला मैं लैला’ गाण्याचे म्यूझिक सुरू होताच लोक जोरदार टाळ्या शिट्ट्या वाजवू लागले.  सनीने नाचायला सुरुवात करताच लोकही हे गाण्यावर आपआपल्या जागेवर गाणे गुणगुणत व नाचत होते. सनी लिओन हे गाने यु-ट्युबर सर्वाधिक पाहिल्या जाणाºया गाण्यात काही दिवसांतच सामील झाले आहे. या गाण्याची जादू पाहण्याची संधी सनीला लाईव्ह मिळाली असेच म्हणावे लागेल.