या चॅलेंज देणा-या व्हिडिओत सनी एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतेय आणि तिचे अनेक मित्र यादरम्यान तिला ज्वॉईन करताहेत. तूर्तास या व्हिडिओला १५ हजारांवर व्ह्युज मिळाले आहेत. twitterवरही सनीचे चॅलेंज नंबर एकवर ट्रेंड करत आहे. अलीकडे सनीचा ‘तेरा इंतजार ’ हा सिनेमा रिलीज झाला होता. अर्थात बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
ALSO READ :OMG! इमेज बदलण्याच्या प्रयत्नांत सनी लिओनी होणार ‘वाईल्ड’ !
सध्या सनी आपल्या इमेज मेकओव्हरमध्ये लागलीय. ‘पॉर्न स्टार’ ही इमेज सनीला पुसून काढायची आहे. बॉलिवूडमध्ये सनीला आत्तापर्यंत बोल्ड भूमिकाच मिळाल्या. त्यामुळे अलीकडे सनीने साऊथकडे मोर्चा वळवला आहे. साऊथमध्ये एक पीरियड ड्रामा फिल्म सनीने साईन केली आहे. यात सनी अॅक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्यासही सनी उत्सुक आहे. माधुरी दीक्षित, कंगना राणौत, विद्या बालन अशा बड्या अभिनेत्रींनी या बायोपिकसाठी नकार दिला असतानाच सनीने मात्र यात इंटरेस्ट दाखवला आहे. अर्थात तूर्तास दिग्दर्शकांनी या बायोपिकसाठी सनीचे नाव फायनल केलेले नाही. या व अशा चित्रपटामुळे तरी आपली इमेज बदलेल, असा सनीचा कयास आहे. आता या प्रयत्नांत सनीला किती यश मिळते, ते बघूच.