Join us

पतीसोबत खुलेआम रोमॅण्टिक झाली सनी लिओनी, शेअर केले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:04 IST

अभिनेत्री सनी लिओनी हिच्याबद्दल चर्चा करताच रोमान्स आणि हॉटनेसचे कॉम्बिनेशन समोर येते. सध्या बॉलिवूडमध्ये सनीची जादू जबरदस्त दिसून येत ...

अभिनेत्री सनी लिओनी हिच्याबद्दल चर्चा करताच रोमान्स आणि हॉटनेसचे कॉम्बिनेशन समोर येते. सध्या बॉलिवूडमध्ये सनीची जादू जबरदस्त दिसून येत आहे. केवळ अभिनयच नाही तर ग्लॅमरच्या दुनियेतही सनीचा दबदबा स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळेच देश-विदेशात सनीचे फॅन फॉलोअर्स निर्माण होत आहेत. त्यातच सनीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर होत असल्याने सनी नेहमीच तिचे काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असते. आता तिने असेच काहीसे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून खळबळ उडवून दिली आहे. सनीने काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीसोबतचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. दोघेही या फोटोमध्ये रोमॅण्टिक अंदाजात बघावयास मिळत आहेत. यातील एका फोटोमध्ये सनी एका रिसोर्टच्या लॉबीमध्ये पतीसोबत कोजी होताना दिसत आहे. सनीला डेनियलने मिठीत पकडले असून, तिच्या डोळ्यात तो बघत आहे. दोघेही या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहेत. सनीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला असून, ज्यावर सोनेरी रंगाची कलाकुसर आहे. तर डेनियल पांढºया रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या ट्राउजरवर दिसत आहे. तो एकदमच फॉर्मल लूकमध्ये बघावयास मिळत आहे. तर दुसºया एका फोटोमध्ये सनी आणि तिचा पती डेनियल त्याच रिसोर्टच्या लॉबीमध्ये एकमेकांच्या समोर उभे असल्याचे दिसत आहेत. दोघेही एकमेकांना बघत आहेत. सनी आणि डेनियल नेहमीच एकमेकांसोबत बघावयास मिळतात. सनी कुठल्या इव्हेंट अथवा पार्टीमध्ये गेल्यास डेनियल तिच्यासोबत बघावयास मिळतो. सनी लवकरच अरबाज खानसोबत झळकणार आहे.