Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे तिच्या आईला लागलं दारुचं व्यसन; 'ही' एक चूक पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 11:13 IST

Sunny leone: या अभिनेत्रीला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो असं तिने म्हटलं आहे.

सनी लिओनी हे नाव सध्या कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये तिचा जम बसवला आहे. त्यामुळे आता प्रतिष्ठीत अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सनीने पॉर्न इंडस्ट्री सोडून बरीच वर्ष झाली. मात्र, त्या इंडस्ट्रीमध्ये असताना तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर अनेक गंभीर परिणाम झाले होते. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईच्या व्यसनावर भाष्य केलं. माझ्यामुळे माझी आई दारुच्या आहारी गेली असं तिने म्हटलं.

सनी लिओनीचं खरं नाव करणजीतकौर वोहरा असं असून ती शीख कुटुंबात तिचा जन्म झाला. सनीचं सगळं बालपण कॅनडात गेलं. विशेष म्हणजे सनीने अडल्ट इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब नाराज झालं होतं. तिने निवडलेलं करिअर तिच्या आईला जराही मान्य नव्हतं. ज्यामुळे त्या दारुच्या आहारी गेल्या होत्या.

"माझ्या आईला दारुचं व्यसन लागलं त्यामागचं कारण म्हणजे माझं अडल्ट इंडस्ट्रीमध्ये जाणं. मी या क्षेत्रात जावं असं माझ्या घरातील कोणत्याच व्यक्तीला वाटत नव्हतं. पण मी स्वत:च्या इच्छेने हे करिअर निवडलं होतं. त्यामुळेच माझी आई खूप चिंतेत असायची. परिणामी, तिला दारुचं व्यसन जडलं. त्यावेळी ती दारु पितीये याचं मला काहीच वाटत नव्हतं. पण, आज विचार केल्यानंतर मला खूप पश्चाताप होतो", असं सनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "हे एक व्यसन आहे आणि जे मानसिकदृष्ट्या काहीतरी होतं जे आतून सुधारणं आवश्यक होतं. यात माझा, माझ्या भावाचा किंवा वडिलांचा काहीही संबंध नव्हता." दरम्यान, सनीने ही इंडस्ट्री सोडून बरेच वर्ष झाले. आता ती बॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. तसंच सनी तीन मुलांची आईदेखील आहे. सनीला एक मुलगी आणि दोन मुलं असा तिचा छानसा परिवार आहे. 

टॅग्स :सनी लिओनीसेलिब्रिटीबॉलिवूड