Join us  

सनी देओलच्या घरी लगीनघाई, लेक करण देओल चढणार बोहल्यावर; द्रिशा आचार्यसोबत घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 12:57 PM

बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई सुरू आहे. आमिर खाननंतर सनी देओलच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरु झाली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या लगीन घाई  सुरू आहे. नुकतीच आमिर खानची लेक इरा खानच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली.आमिरनंतर सनी देओलच्या घरीसुद्धा लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सनी देओलचा लेक आणि  धर्मेंद्र यांचा नातू करण देओल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. धर्मेंद्र यांच्या जुहू इथील बंगल्यात लग्नाच्या तयारी सुरु झाली आहे. करण देओल लवकरच प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, करण देओलचा लग्न सोहळा तीन दिवस चालणार असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणाचीही माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या तयारीसाठी धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी उत्साही आहेत. हे लग्न 16, 17, 18 जून असे तीन दिवस चालणार असल्याचे बोलले जात आहे. रिसेप्शन 18 जून रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे आहे. करण द्रिशाचे 18 जून रोजी मुंबईत पोस्ट-वेडिंग रिसेप्शन होणार आहे. निमंत्रणपत्रिका छापण्यात आली असून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील जवळपास सर्वांनाच आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत.

द्रिशा आणि करण गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. साखरपुड्यानंतर दोघे एकत्र मुंबईत स्पॉट झाले होते. यादरम्यान दोघांनी पापाराझींनी पोजही दिल्या होत्या. 

टॅग्स :सनी देओलकरण देओल