Join us

​सनी देओल म्हणतो, मी व्यस्त आहे, निवडणूकीत उभा राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 20:48 IST

अभिनेत्री रिमी सेन भाजपात सामील झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच अभिनेता सनी देओलच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. सनी ...

अभिनेत्री रिमी सेन भाजपात सामील झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच अभिनेता सनी देओलच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. सनी देओल भाजपात प्रवेश करणार आहे अशा बातम्या येत होत्या. मात्र अभिनेता सनी देओलने आपल्या विषयीच्या बातम्यांना विराम देत मी एका अन्य कामात व्यस्त असल्याचे सांगितले आहे.  सनीचा मुलगा करण सिंग देओल बॉलिवूड डेब्यू करणार असून त्याच्या लाँचिंगची जबाबदारी सनीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. अभिनेता सनी देओलचा मागील वर्षी ‘घायल वन्स मोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मात्र तो चित्रपटात झळकला नाही. दरम्यान निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सनी देओल भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. असेही सांगण्यात येत होते की सनी पंजाबमधून भाजपाकडून निवडणूक लढणार आहे. रिमी सेनच्या भाजपा प्रवेशानंतर याला आणखीच ऊ त आला होता. मात्र या सर्व बातम्यांना विराम देत सनी देओलने आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसून निवडणूक लढणार  नसल्याचे सांगितले आहे. सनी देओलने ट्विटरहून ही माहिती दिली. त्याने लिहले, ‘मी कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नाही. यावेळी मी माझा मुलगा करण सिंह देओलच्या ‘पल पल दिल के पास’च्या लाँचमध्ये व्यस्त आहे’. Read More : पोस्टर बॉयज मध्ये देओल ब्रदर्सपंजाब राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने सनी भाजपात प्रवेश करून पक्षाला मजबूत करेल अशा बातम्या येत होत्या. यामागील कारण असे की, सनी देओलला ‘पंजाब का पुत्तर’ या नावाने ओळखले जाते. अशा वेळी तो निवडणूक लढणार अशा बातम्या येत असताना त्याचे चाहते खूश झाले होते. मात्र, त्याच्या चाहत्यांना सनीच्या ट्विटमुळे निराशा झाली आहे. मात्र त्याचे चाहत्यांसाठी त्याने आनंदाची बातमीही दिली आहे. सनीचा मुलगा करण सिंह बॉलिवूड डेब्यू करणार आहे. Read More : ​‘घातक’चा नवा लूक तुम्ही पाहिलात का?क रण सिंह डेब्यू करीत असलेला ‘पल पल दिल के पास’ हा रोमाँटिक चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन स्वत: सनी देओल करीत आहे. असेही सांगण्यात येते की, या चित्रपटासाठी तो एका अभिनेत्रीच्या शोधात आहे. यासाठीच तो काही दिवसांपूर्वी दिल्लीत आला होता. त्यावेळी त्याने या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. यात करण सिंग देओलची एक झलक पहायला मिळाली होती.ALSO READ ​सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ आता आमच्या हातात नाही - पहलाज निहलानी‘एक्स्पेंडेबल्स’चा हिंदी रिमेक ; सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, सनी देओल येणार एकत्र?