Join us  

सावत्र बहीण इशा देओलसोबत संबंध चांगले नसूनही सनी देओल यांनी केली होती ही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 4:14 PM

इशा ही सनी देओल यांची सावत्र बहीण असून हेमा मालिनी यांच्या इशा आणि आहाना या दोन मुली आहेत.

ठळक मुद्देधर्मंद्र यांचे भाऊ अजीत सिंह खूप आजारी असताना इशाला त्यांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने याबद्दल सनी यांना सांगितले होते. सनी यांनी इशाची भेटण्याची पूर्ण व्यवस्था करून दिली होती.

लोकसभा निवडणुकीचे नुकतेच निकाल आहे असून पंजाबमधील गुरुदासपूरमधून अभिनेते सनी देओल भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. सनी यांच्या या यशांतर त्यांना विविध क्षेत्रातील लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. त्यांना त्यांची बहीण इशा देओलने ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. इशाने म्हटले आहे की, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा... माझ्या सदिच्छा कायम तुमच्या सोबतच आहेत.

इशा ही सनी देओल यांची सावत्र बहीण असून हेमा मालिनी यांच्या इशा आणि आहाना या दोन मुली आहेत. या दोघींसोबत सनी देओल यांचे संबंध फार काही चांगले नाहीयेत. पण असे असताना देखील इशाला सनी यांनी एकदा मदत केली होती. ही गोष्ट ती कधीच विसरू शकत नाही. हा किस्सा राम कलम मुखर्जी यांनी हेमा मालिनीः बियाँड द ड्रीम गर्ल या पुस्तकात लिहिला आहे. 

राम कलम मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिले होते की, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न झाल्यानंतर या दोन्ही कुटुंबांना त्यांनी नेहमीच वेगळेच ठेवले होते. इशा ही त्यांच्या वडिलोपार्जित घरात पाऊल ठेवणारी त्या कुटुंबातील पहिली व्यक्ती होती. धर्मंद्र यांचे भाऊ अजीत सिंह खूप आजारी असताना इशाला त्यांना भेटण्याची इच्छा होती. इशा आणि आहाना यांचे काका अजीत आणि त्यांचा मुलगा अभय यांच्यासोबत लहानपणापासून खूपच चांगले नाते आहे. त्यामुळे तिने याबद्दल सनी यांना सांगितले होते. सनी यांनी इशाची भेटण्याची पूर्ण व्यवस्था करून दिली होती. धर्मेंद्र यांच्या वडिलोपार्जित घरात इशाने जन्मल्यानंतर 34 वर्षांनी पाऊल ठेवले. या घरात हेमा मालिनी किंवा आहाना या देखील कधीच गेल्या नव्हत्या. इशाने जाऊन काकांची भेट घेतली. त्यानंतर तिथे ती पहिल्यांदाच धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना भेटली होती. 

इशा देओल आणि तिच्या काकांची भेट झाल्यानंतर काहीच महिन्यात त्यांचे निधन झाले होते. त्यांना भेटण्याची इशाची इच्छा केवळ सनीमुळे पूर्ण झाली होती.

टॅग्स :सनी देओलधमेंद्रलोकसभा निवडणूक निकाल