Join us  

लेक करण देओलच्या रोका सेरेमनीमध्ये सनी देओल यांनी केला जबरदस्त डान्स, INSIDE व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:41 PM

सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या रोका सेरेमनीत नवे व्हिडिओ समोर येत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या रोका सेरेमनीत नवे व्हिडिओ समोर येत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर, व्हिडिओमध्ये, सनी देओल त्यांच्या 2018मध्ये आलेल्या 'बधाई हो' चित्रपटातील मोरनी बनके गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत, ज्यावर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

व्हिडिओमध्ये ब्लॅक शर्ट आणि जीन्स घातलेला सनी देओल त्यांच्याच स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. तर त्याच्यासोबत उभी असलेली व्यक्ती शिट्टी वाजवताना दिसत आहे. यापूर्वी पापाराझींसोबत बोलताना सनी देओल मस्ती करताना दिसले होते, ज्यामध्ये त्यांच्यासोबत भाऊ अभय देओल आणि बॉबी देओल देखील होते.

आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये करण देओल आणि द्रिशा आचार्याचा केक कापतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये करणने निळ्या रंगाचा कुर्ता तर द्रिशाने गोल्डन कलरची साडी नेसलेली आहे. द्रिशा आणि करण गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. 

 

मीडिया रिपोर्टनुसार, हे लग्न 16, 17, 18 जून असे तीन दिवस चालणार असल्याचे बोलले जात आहे. रिसेप्शन 18 जून रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे आहे. करण द्रिशाचे 18 जून रोजी मुंबईत पोस्ट-वेडिंग रिसेप्शन होणार आहे. निमंत्रणपत्रिका छापण्यात आली असून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील जवळपास सर्वांनाच आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. संपूर्ण देओल कुटुंब करण आणि द्रिशाच्या लग्नात सहभागी झाल्याची बातमी आहे.

टॅग्स :सनी देओलकरण देओल