करिश्मा कपूरचा एक्स पती बिजनेसमॅन संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव हिच्यावर कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. संजय कपूर आणि करिश्माचा घटस्फोटही प्रियामुळेच झाल्याचं त्यांची बहीण मंधीरा कपूरने म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूरने प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत.
मंधीरा कपूरने विकी लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. करिश्मा आणि संजय कपूर यांचं लग्न झालेलं असतानाही प्रिया त्यांना सतत मेसेज करायची असं मंधीराने म्हटलं आहे. ती म्हणाली, "जेव्हा भाऊ लोलोसोबत होता तेव्हा प्रिया त्याला सतत मेसेज करायची. ही गोष्ट मला माहीत आहे. ते त्यांचं लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना त्यांचं नातं तोडायचं नव्हतं. पण, एक महिला म्हणून तुमचा नुकताच घटस्फोट झालेला असताना आणि दुसऱ्या महिलेला आधीच एक मूल आहे आणि नुकतंच दुसरं मूल झालेलं असताना असा विचार कसा करू शकता? एखाद्याचा संसार तुम्ही कसा मोडू शकता? हे कसले संस्कार आहेत? ते त्यांचं लग्न वाचवायचा प्रयत्न करत होते आणि त्यांना दोन मुलं होती. तिने त्यांच्यापासून दूर राहायला हवं होतं".
संजय कपूर आणि करिश्माच्या लग्नाबाबत मंधीराने सांगितलं की "अशा खूप गोष्टी घडल्या ज्या योग्य नव्हत्या. माझ्या वडिलांनी त्यांना नातं सुधारण्याचा सल्ला दिला होता. संजयही सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना दुसरं मूलही झालं होतं. हे सगळं असंच होत नाही. या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही तुमचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत असता. जर त्याला तेव्हा एकटं सोडलं असतं तर सगळं काही ठीक झालं असतं".
Web Summary : After Sanjay Kapoor's death, his sister Mandira Kapoor alleged Priya Sachdev caused Sanjay and Karisma's divorce. Priya constantly messaged Sanjay during his marriage with Karisma, hindering reconciliation efforts, Mandira claimed.
Web Summary : संजय कपूर के निधन के बाद, उनकी बहन मंदिरा कपूर ने आरोप लगाया कि प्रिया सचदेव ने संजय और करिश्मा के तलाक का कारण बनीं। मंदिरा ने दावा किया कि प्रिया ने करिश्मा के साथ संजय के विवाह के दौरान लगातार मैसेज भेजे, जिससे सुलह के प्रयासों में बाधा आई।