सुनीताने नावजुद्दीन सिद्धीकीला पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:24 IST
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुनिता राजवरने नवाजुद्दीन सिद्धीकीला लीगल नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीनने आपल्या पुस्तकात 'एन ऑर्डिनरी लाइफ'मध्ये सुनीता राजवरबरोबर ...
सुनीताने नावजुद्दीन सिद्धीकीला पाठवली नोटीस
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुनिता राजवरने नवाजुद्दीन सिद्धीकीला लीगल नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीनने आपल्या पुस्तकात 'एन ऑर्डिनरी लाइफ'मध्ये सुनीता राजवरबरोबर असलेले संबंधाचा याचा उल्लेख केला असले. या पुस्तकात नवाजुद्दीनने आपले संबंध सुनीता राजवर आणि निहारिका सिंहबरोबर असल्याचे म्हटले आहे. आता ह्या तारकांचे म्हणणे आहे की, नवाजुद्दीनने त्यांच्या परवानगी शिवाय हे सगळे समोर आणले बघायला गेलं तर हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. या पुस्तकात नवाजने निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे. मी कधीच तिच्याशी प्रियकरासारखे बोललो नाही. अखेर एके दिवशी तिला कळले की, मी केवळ स्वत:चा विचार करणारा पुरुष आहे आणि तिने मला सोडले.मी रडलो. गयावया केली. माफी मागितली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती,असे नवाजने यात म्हटले होते.तुम्हाला सांगू इच्छितो की सुनीताने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हे शेअर केले होते की ते एकमेकांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पासून ओळखतात आणि ह्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी खोट्या आहेत.नंतर सुनीताने हे पण सांगितले की नवाजुद्दीनशी असलेले संबंधची बातमीमुळे तिच्या कुटुंबात अडचण सूरज झाली आहे. ह्यांनतर सुनीताने केवळ नवाजुद्दीनवर नाही तर हे पुस्तक लिहिण्यास मदत करणारी रितपुरणा चॅटर्जी आणि पुस्तकाच्या पब्लिशरला सुध्दा नोटीस पाठवली आहे.नोटीसमध्ये सुनीताने असे सांगितले आहे की नावजुद्दीन च्या ह्या पुस्तकामुळे मला फार त्रास झाला आहे आणि माझी इमेज सुद्धा खराब झाली हेमाला ह्याचा मानसिक त्रास होत आहे ती पुढे असे म्हणाली ह्या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री लगेच थांबवण्यात यावी आणि २४तासात नवाजुद्दीन ने त्यांची माफी मागावी आणि २ कोटी द्यावे. नवाजने हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर अवघ्या आठ दिवसातच परत घेतले. ---