Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिला फक्त पैसे हवेत, प्रेम नाही" गोविंदाच्या अफेअरवर पत्नी सुनीताचा खुलासा; 'त्या' महिलेवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:25 IST

सुनीता आहुजानं आता स्वत: गोविंदाच्या आयुष्यातील 'त्या' दुसऱ्या महिलेबद्दल धक्कादायक दावे केले आहेत.

Sunita Ahuja On Govinda Affair  :बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या होत्या.  गोविंदाचे अफेअर सुरू असल्याच्या अफवा होत्या. अनेकदा सुनीताने याबाबत उघडपणे भाष्यही केलं आहे. आता सुनीताने केलेल्या वक्तव्याने मात्र सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सुनीता आहुजानं आता स्वत: गोविंदाच्या आयुष्यातील 'त्या' दुसऱ्या महिलेबद्दल धक्कादायक दावे केले आहेत.

'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, "मी २०२५ हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट मानते. गोविंदाचं कोणाशी तरी अफेअर असल्याचं मी ऐकतेय, पण मला खात्री आहे की ती मुलगी अभिनेत्री नाही. कारण अभिनेत्री अशा वाईट गोष्टी करत नाहीत. ती मुलगी गोविंदावर प्रेम करत नाही, तिला फक्त त्याचे पैसे हवे आहेत".

सुनीता आहुजानं आपल्या भावना व्यक्त करताना गोविंदाला खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या, "गोविंदाने हे समजून घेण्याची गरज आहे की त्याच्या आयुष्यात आई, पत्नी आणि मुलगी या तीनच महत्त्वाच्या महिला आहेत. कोणत्याही पुरुषाला त्याच्या आयुष्यात चौथ्या महिलेला स्थान देण्याचा अधिकार नाही. गोविंदाने हे सर्व वाद संपवून पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं".

सुनीता पुढे म्हणाल्या, "मला २०२६ मध्ये माझं आयुष्य बदलायचं आहे. मला एक आनंदी कुटुंब हवं आहे. मला आशा आहे की गोविंदाला लवकरच आपली चूक उमजेल आणि तो या वादातून बाहेर पडेल".

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda's wife, Sunita, accuses woman of wanting money, not love.

Web Summary : Sunita Ahuja addressed Govinda's alleged affair, stating the woman involved is after his money, not love. She emphasized the importance of family and urged Govinda to refocus on his career, hoping for a family reconciliation in 2026.
टॅग्स :गोविंदा