Join us

​सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या बॉलिवूड डेब्यूसाठी डिसेंबरचे मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 10:10 IST

तूर्तास बॉलिवूड स्टार किड्सच्या बॉलिवूड डेब्यूचे दिवस आहे. अनेक स्टार किड्स बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या बातम्या चहूबाजुंनी येत आहेत. ...

तूर्तास बॉलिवूड स्टार किड्सच्या बॉलिवूड डेब्यूचे दिवस आहे. अनेक स्टार किड्स बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या बातम्या चहूबाजुंनी येत आहेत.  सारा अली खान, जान्हवी कपूर, शाहरूखची मुलगी सुहाना अशा कित्येकांच्या बॉलिवूड डेब्यूची लोकांना प्रतीक्षा आहे. याच यादीत आणखी एक नाव आहे. हे नाव म्हणजे, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याचे. होय,  साजिद नाडियाडवालाच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे अहान बॉलिवूड पर्दापण करणार आहे. अहानचे डॅड सुनील शेट्टी याला याबाबत विचारले असता, त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला. येत्या डिसेंबरपर्यंत अहान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे आणि तो अगदी योग्य मार्गावर आहे. तो सध्या लंडनमध्ये अ‍ॅक्टिंगचे धडे गिरवतो आहे. बॉलिवूडचा नंबर वन फिल्म प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला त्याचा चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. यात फॉक्स एंटरटेनमेंटही सहभागी असेल. त्यामुळे अहानचा बॉलिवूड डेब्यू एकदम दमदार असेल, असे मला वाटतेय. यानंतर सगळे काही अहानचे टॅलेंट, त्याची पर्सनॅलिटी आणि लक यावर अवलंबून आहे, असे सुनील शेट्टी म्हणाला.साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटासाठी अहान सध्या एका अ‍ॅक्शन स्पेशालिस्टकडून ट्रेनिंग घेतोय. हे ट्रेनिंग एक्सटेंसिव्ह प्रोग्रामचा भाग आहे. यानंतर अहान मार्शल आर्ट्स शिकेले. शिवाय अन्य काही फिजिकल ट्रेनिंगही घेईल.ALSO READ : अहान कोणाला करतोय डेट?सुनीलची लाडकी लेक अथियाने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.  लवकरच अथिया ‘मुबारकां’मध्ये दिसणार आहे. एकंदर काय तर अथियाचे करिअर मार्गी लागलेय. आता सुनील शेट्टी यांना अहानच्या करिअरची चिंता आहे. पण साजिद नाडियाडवाला यांचा वरदहस्त म्हटल्यावर सुनीलला चिंता नकोच...काय बरोबर ना?