सुनील शेट्टीचे कमबॅक...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 16:31 IST
सुनील शेट्टी हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. २०१३ चा थ्रिलरपट ‘एनिमी’ या इंग्रजी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो ...
सुनील शेट्टीचे कमबॅक...!
सुनील शेट्टी हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. २०१३ चा थ्रिलरपट ‘एनिमी’ या इंग्रजी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत या चित्रपटाचे नाव सध्या ‘रिलोडेड’ असे ठेवण्यात आले आहे. सुनील शेट्टी यात एक्स कर्नल या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची टीम मलेशियामध्ये शूटींग करणार आहे. सुनीलला काही अॅक्शन सीन्सही करावे लागणार आहेत. त्यासाठी तो ट्रेनिंगही घेत आहे. खलनायकाची भूमिका मिळाल्याने त्याला प्रचंड आनंद झाल्याचे तो सांगतो.