सुनील शेट्टीने चाहत्यांसाठी ट्विटर अकाउंट काढले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 12:03 IST
तब्बल दोन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नुकतेच ट्विटर अकाउंट काढले आहे. ‘ट्विटर हा ...
सुनील शेट्टीने चाहत्यांसाठी ट्विटर अकाउंट काढले !
तब्बल दोन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नुकतेच ट्विटर अकाउंट काढले आहे. ‘ट्विटर हा आपला आवाज आहे आणि चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम माध्यमांपैकी एक आहे. मी दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे.’ असे सुनीलने सांगितले. अभिनेता हृतिक रोशनच्या २०१४ मधील बँग बँगचा सिक्वेल असलेल्या रिलोडेडमधून सुनील पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडीस प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.