Join us  

Sunil Grover Heart Surgery: कॉमेडियन सुनील ग्रोवरवर मुंबईत हार्ट सर्जरी; चाहत्यांना धक्का, प्रकृती उत्तम असल्याची रुग्णालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 3:41 PM

Sunil Grover Heart Operation : सुनील ग्रोवरनं कपिल शर्मा कॉमेडी शोमधून मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांसह काही वेबसीरिजमध्येही त्यानं काम केलं आहे.

Sunil Grover Heart Operation : सुनील ग्रोवरनं कपिल शर्मा कॉमेडी शोमधून मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांसह काही वेबसीरिजमध्येही त्यानं काम केलं आहे. त्याच्या तब्येतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

Sunil Grover Heart Operation : बॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॉमेडियन सुनील ग्रोवरवर (Sunil Grover) हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील 'एशियन हार्ट इन्स्टिट्यूट'मध्ये सुनीलवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीलची तब्येत ठीक असून तो उत्तम प्रतिसाद देखील देत आहे. 

सुनील ग्रोवर यानं गेल्याच आठवड्यात त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो छोले भटुरेच्या दुकनात चक्क भटूरे तळत असल्याचं दिसून आलं होतं. व्हिडिओ तुफान व्हायरल देखील झाला होता आणि चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या होत्या. काही युझर्सनं तर आता अभिनय सोडून हे काम सुरू केलं का? असंही मिश्किलपणे विचारलं होतं. 

सुनील ग्रोवरच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सुनील ग्रोवर त्याच्या तब्येतीबाबत नेहमीच जागरुक राहणारा कलाकार आहे. गेल्याच महिन्यात फिल्मफेअरनं सर्वोत्तम कलाकार ओटीटी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 'झी फाइव्ह'वर आलेल्या 'सनफ्लावर' या वेबसीरिजसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. 

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वितुष्ट आता संपुष्टात आल्याचीही माहिती समोर आली होती. अभिनेता सलमान खान यानं दोघांमध्ये मध्यस्ती करुन वाद मिटवल्याचं बोललं जात होतं. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातून मायदेशात परतत असताना विमानात आणि त्याआधी बॅकस्टेजवर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर सुनील ग्रोवरनं कपिल शर्मा शो सोडला होता. 

टॅग्स :सुनील ग्रोव्हरटेलिव्हिजनबॉलिवूडकपिल शर्मा