Join us

भैया-भाभीच्या दुराव्याला सल्लूने लावला पूर्णविराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 22:10 IST

मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. त्यांच्या दुराव्याचे कारण दुसरे तिसरे ...

मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. त्यांच्या दुराव्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून केवळ अफवा आणि मलायकाची अर्जुन कपूरसोबत वाढलेली जवळीक हे बोलले जात आहे.त्यांच्या लग्नाला आता १७ वर्षे पूर्ण झाली असून ते आता घटस्फोट घेऊ इच्छितात म्हटल्यावर सर्वांनाच त्याचा धक्का बसला. ते दोघे एक शो ‘पॉवर कपल’ होस्ट करत आहेत. पण प्रथम अशी अफवा आली की, ते दोघेही हा शो करण्यास तयार नाहीत. सर्वांचे सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर दोघांचाही दुवा सल्लूमियाँ त्यांच्या भांडणात पडला. आणि त्याने अखेर त्या दोघांमधील भांडण मिटवले. }}}}}}}}