Join us

​लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसला सुहाना खानचा जलवा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 13:27 IST

शाहरूख खानची लाडकी अन् ग्लॅमरस लेक सुहाना खान पुन्हा चर्चेत आली आहे.  सुहाना ‘लॅक्मे फॅशन वीक2017’मध्ये पोहोचली अन् मग ...

शाहरूख खानची लाडकी अन् ग्लॅमरस लेक सुहाना खान पुन्हा चर्चेत आली आहे.  सुहाना ‘लॅक्मे फॅशन वीक2017’मध्ये पोहोचली अन् मग शाहरूखची मुलगी म्हटल्यावर सगळेच कॅमेरे तिच्यावर खिळले.शनिवारी ‘लॅक्मे फॅशन वीक2017’मध्ये सुपरड्राय इंडिया पार्टीचे (सुपरड्राय क्लोदिंग लाईन आहे.)आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी किड्स  सहभागी झालेत. सुहाना खान यावेळी स्टनिंग लुकमध्ये दिसून आली. सुहानासोबत संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांचा गॉर्जियस लूकही यावेळी बघायला मिळाला. सुहाना यावेळी हाफ स्लीव्ज टॉप आणि व्हाईट कलर जीन्समध्ये दिसली. सेंट लुरेन्टचे बूट आणि जिमी चूची बॅग तिने कॅरी केली होती. अन्ययाचे म्हणाल तर तिने आॅफ शोल्डर व्हाईट कलरच्या लाईनिंगचा टॉप आणि जीन्स कॅरी केला होता. या पार्टीत सोहेल खानचा मुलगा निर्वाण आपल्या मित्रांसोबत स्पॉट झाला.  काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची लाडकी सुहाना खान आपल्या मित्रांसोबत  ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बघण्यासाठी गेली होती. मात्र सुहानाला बघताच काही मीडियावाल्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मीडियाचे कॅमेरे बघितल्यानंतर सुहाना खूपच घाबरून गेली होती. तिच्या चेहºयावरील भीती स्पष्टपणे दिसत होती. मात्र फोटोग्राफर्स तिची एक झलक टिपण्यासाठी आटापिटा करीत होता. तिचा पाठलाग करीत होता. अखेर सुहानाने एका लिफ्टचा आधार घेतला. परंतु त्याठिकाणीही फोटोग्राफर्स पोहोचले. सुहानाची इच्छा नसतानाही फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत होते. यामुळे सुहाना खूपच अनकम्फर्टेबल असल्याचे दिसून येत होती. पुढे हा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओला यू-ट्यूबवर तर प्रचंड हिट मिळाल्या होत्या.