Join us  

'ती कपडे रिपीट करु शकते तर आपण का नाही?' सुहाना खानने केलं आलियाचं कौतुक, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:15 PM

आलियाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या लग्नातलीच साडी नेसली होती.

शाहरुख खानची (Shahrukh Khan) लाडकी सुहाना खान (Suhana Khan) तिच्या डेब्यु सिनेमामुळे चर्चेत आहे. 'द आर्चीज' मधून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या ती सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकतंच सुहानाने अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) स्तुती केली आणि आलिया आपली रोल मॉडेल असल्याचं सांगितलं. 'द आर्चीज'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिने माध्यमांशी दिलखुलास संवाद साधला.

झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' मधून सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे स्टारकिड्स पदार्पण करत आहेत. दरम्यान सुहाना खान म्हणाली,'तुम्ही बघितलं असेलच आलिया भटने तिच्या लग्नाची साडी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी परिधान केली होती. तिच्यासारख्या यशस्वी आणि प्रेरणादायी अभिनेत्रीने हे करणं खरोखरंच अद्भुत आहे. तसंच हा मेसेज पोहोचवणं गरजेचंच आहे. तिने पर्यावरणाच्यादृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल उचललं आहे.'

सुहाना पुढे म्हणाली, 'जर आलिया भट तिची लग्नातील साडी रिपीट करु शकते तर आपणही आपले आऊटफिट एखाद्या पार्टीत पु्न्हा घालू शकतो. दरवेळी नवीन आऊटफिट खरेदी करण्याची गरजच नाही. नवीन कपडे बनवण्यासाठी किती गोष्टी खर्ची होत असतात हे आपल्याला लक्षात येत नाही.'

सुहाना खानच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. 'श्रीमंतांचा किती विचित्र संघर्ष आहे. हे लोक पर्यावरणासाठी कपडे रिपीट करतात. काय युनिक आयडिया आहे यांची','आमच्याकडे तर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कपडे पास केले जातात. या लोकांनी कपडे रिपीट केले नाही तर काय जगाचा विनाश होणार आहे का?' अशा कमेंट्स आल्या आहेत. 'द आर्चीज' हा सिनेमा ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :सुहाना खानआलिया भटसोशल मीडियाट्रोल