Join us
Daily Top 2Weekly Top 5

​संजय दत्तच्या बायोपिकसाठी नाव सुचवा अन् आयफोन-७ जिंका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 12:14 IST

दिग्दर्शक राजकुमार हिरानी अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बायोपिक बनवत असल्याचे, एव्हाना तुम्हाला कळलेले आहेच. पण खरी बातमी पुढे आहे. ...

दिग्दर्शक राजकुमार हिरानी अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बायोपिक बनवत असल्याचे, एव्हाना तुम्हाला कळलेले आहेच. पण खरी बातमी पुढे आहे. ती म्हणजे, या बायोपिकचे नाव अजून ठरलेले नाही. आता तुम्ही म्हणाल, बायोपिकचे नाव अजून ठरलेले नाही, यात काय आले मोठे? पण हीच खरी बातमी आहे. होय, या बायोपिकचे नाव ठरवण्याची संधी काही लोकांकडे आहे. केवळ संधीच नाही तर यात विजयी ठरल्यास ९२ हजार रूपयांचा आयफोन-७ बक्षिस म्हणून मिळणार आहे.संजय दत्तचे बायोपिक नव्या वर्षांत फ्लोरवर येणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक ठरवण्यासाठी हिरानींनी एक स्पर्धा जाहिर केली आहे. पण थांबा... थांबा... या स्पर्धेत तुम्हा-आम्हाला भाग घेता येणार नाहीय. कारण ही स्पर्धा केवळ राजकुमार हिराणींच्या कार्यालयाच्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आहे. कार्यालयात एक बॉक्स ठेवण्यात आला आहे. या बॉक्समध्ये संजय दत्तच्या आयोपिकसाठी सुचलेल्या नावाची चिठ्ठी प्रत्येकाने या बॉक्समध्ये टाकायची आहे. अंतिमत: या बॉक्समधील ज्या नावाला हिराणींची पसंती मिळेल, तो या स्पर्धेचा विजेता ठरेल. त्याला आयफोन-७ बक्षिस म्हणून मिळेल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार रणबीर कपूर आणि सोनम कपूर हे दोघेही भाग घेऊ शकणार आहे. आहे ना रोमांचक़ आता या स्पर्धेचा विजेता कोण ठरतो? शिवाय संजयच्या बायोपिकचे काय नाव ठरते? हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.संजय दत्तच्या बायोपिकला तूर्तास ‘दत्त’ हे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. पण स्पर्धेनंतर या बायोपिकला नवे नाव मिळणार आहे. तेव्हा जस्ट, वेट अ‍ॅण्ड वॉच...