Join us

बॉलीवूडमधील यशस्वी सौंदर्यतारका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 02:36 IST

बॉलीवूडने सौंदर्यतारकांचा नेहमीच सन्मान आणि स्वागत केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून सौंदर्यतारकांनी बॉलीवूडमध्ये आपले नाव कमाविले आहे. या तारकांनी ...

बॉलीवूडने सौंदर्यतारकांचा नेहमीच सन्मान आणि स्वागत केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून सौंदर्यतारकांनी बॉलीवूडमध्ये आपले नाव कमाविले आहे. या तारकांनी बॉलीवूडमध्ये आपले बस्तान बसविले. त्यांच्यामुळेच अनेक चित्रपट हिट झाले आहेत. या अभिनेत्रींनी बॉलीवूडवर अधिराज्य गाजविले आहे. अशा सौंदर्यतारकांची माहिती या ठिकाणी देत आहोत...ऐश्वर्या रॉय४१ वर्षीय ऐश्वर्या रॉयने १९९४ साली मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. १९९४ साली मिस वर्ल्डसाठी तिची निवड झाली. ८६ जणींना मागे टाकत ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब मिळविला. १९९७ साली ‘और प्यार हो गया’ द्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. जीन्स, हम दिल दे चुके सनम, ताल, मोहब्बतें, ब्राईड अँड प्रिज्युडिस, धूम २, गुरु, प्रोव्होक्ड, जोधा अकबर, गुजारिश सारखे हिट चित्रपट दिले. तिने ११२ अ‍ॅवॉर्डस् मिळविले आहेत. ३ फिल्मफेअर, ७ आयफा, ७ स्क्रीन, ६ झी सिने, २ स्टारडस्ट.प्रियंका चोप्रा३२ वर्षीय प्रियंका ही अभिनेत्री आणि गायिका आहे. २००० साली मिस इंडिया स्पर्धेत ती उपविजेती होती. २००० साली तिने मिस वर्ल्ड पुरस्कार मिळविला. २००३ साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी आॅफ अ स्पाय’ या चित्रपटातून पदार्पण केले. अंदाज, मुझसे शादी करोगी, ऐतराज, करम, वक्त: र रेस अगेन्स्ट टाईम, ब्लफमास्टर, टॅक्सी नं. ९२११, क्रीश, डॉन, सलाम-ए-ईश्क, द्रोणा, फॅशन, कमिने, अग्नीपथ, बर्फी, बाजीराव मस्तानी असे अनेक चित्रपट केले. तिने ७७ पुरस्कार मिळविले आहेत.जुही चावला४७ वर्षीय जुही चावला ही अभिनेत्री, निर्माती आणि दूरचित्रवाणीची संचालिका आहे. १९८४ साली तिने मिस इंडियाचा किताब पटकावला. १९८६ साली सल्तनतपासून तिने चित्रपटात पाऊल ठेवले. कयामत से कयामत तक, बोल राधा बोल, राजू बन गया जंटलमन, हम है राही प्यार के, डर, कभी हां कभी ना, यस बॉस, इश्क, दरार, मिस्टर अँड मिस खिलाडी, दिवाना मस्ताना, डुप्लीकेट, फिर भी दिल है हिंदुस्तानी असे अनेक चित्रपट केले. तिने २ फिल्मफेअर २ स्टार स्क्रीन असे अनेक पुरस्कार मिळविले आहेत.जीनत अमान६३ वर्षीय जीनत अमान १९७० साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेतील उपविजेत्या होत्या. १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा पुरस्कार मिळविला. फिल्मफेअर पुरस्कार, बीएफजेए, झी सिने आणि आयफा पुरस्कार मिळविले आहेत. १९७० साली हलचल चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हंगामा, हरे रामा हरे कृष्णा, यादों की बारात, धुंद, रोटी कपडा और मकान, चोरी मेरा काम, बालिका वधू, हम किसीसे कम नही, हिरालाल पन्नालाल, शालीमार, द ग्रेट गॅम्बलर, डॉन, कुर्बानी चित्रपटात त्यांनी काम केले आहे.सुश्मिता सेन३९ वर्षीय भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री सुश्मिता सेनने १९९४ साली ऐश्वर्या रॉयला मागे टाकत मिस इंडिया किताब मिळविला. याच वर्षीय मिस युनिव्हर्स मिळविण्याचा मान मिळविणारी ती पहिली भारतीय होती. १९९६ साली दस्तक चित्रपटातून तिने सुरुवात केली. जोर, सिर्फ तुम, बिवी नं. १, बस इतना सा ख्वॉब है, आँखे, फिलहाल, समर, वास्तू शास्त्र, मैं हु ना, पैसा वसूल, चिंगारी, मैने प्यार क्यू किया असे चित्रपट केले. फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, आयफा, झी सिने अ‍ॅवॉर्डस् असे पुरस्कार मिळविले आहेत.नम्रता शिरोडकर४२ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने १९९३ साली मिस इंडिया किताब पटकावला. मिस युनिव्हर्समध्ये ती सहावी आली. मिस एशिया पॅसिफिकमध्ये दुसरी आली. पुरब की लैला पश्चिम का छैला चित्रपटातून तिने कारकीर्दीस सुरुवात केली. १९९८ साली जब प्यार किसीसे होता है, हिरो हिंदुस्थानी, वास्तव, पुकार, हत्यार, दिल विल प्यार व्यार, एलओसी कारगिल, ब्राईड अँड प्रिज्युडिस असे चित्रपट केले.दिया मिर्झा३२ वर्षीय मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झाने २००० साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल पुरस्कार पटकावत तिसरी भारतीय होण्याचा मान मिळविला. २००१ साली रहना है तेरा दिल में या चित्रपटापासून सुरुवात केली. दीवानापन, तुमको ना भुल पाऐंगे, तुमसा नही देखा, परिणीता, अलग, शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला, कुर्बान असे चित्रपट केले. झी सिने, बॉलीवूड मुव्ही असे अनेक पुरस्कार मिळविले.नेहा धुपिया३४ वर्षीय नेहाने २००२ साली फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स किताब मिळविला. मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती १९ वी आली. २००३ साली कयामत चित्रपटातून तिने सुरुवात केली. ज्युली, रक्त, शीशा, क्या कुल है हम, गरम मसाला, फाईट क्लब, तिसरी आँख, चुप चुप के, देल्ही हाईटस्  अशा चित्रपटातून तिने काम केले.