Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ही’ आहे दिव्या भारतीची स्टायलिश बहीण, पाहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST

९ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो राधिका आपटे आणि सोनम कपूरसोबत बघावयास मिळत आहे. अक्षय गेल्या २७ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. यादरम्यान त्याने कित्येक अभिनेत्रींसोबत काम केले. काही अजून करीत आहेत, तर काही इंडस्ट्रीमधून गायबच झाल्या आहेत. त्यातीलच एक नाव अभिनेत्री कायनात अरोरा हे आहे.

९ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो राधिका आपटे आणि सोनम कपूरसोबत बघावयास मिळत आहे. अक्षय गेल्या २७ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. यादरम्यान त्याने कित्येक अभिनेत्रींसोबत काम केले. काही अजून करीत आहेत, तर काही इंडस्ट्रीमधून गायबच झाल्या आहेत. त्यातीलच एक नाव अभिनेत्री कायनात अरोरा हे आहे. कायनातने २०१० मध्ये अक्षयकुमारसोबत ‘खट्टामिठा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सध्या ती अभिनयापासून दूर आहे. अखेरीस ती ‘ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.२ डिसेंबर १९८२ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या कायनातबद्दल ही गोष्ट खूपच कमी लोक जाणून आहेत की, ती ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीची बहीण आहे.कायनात दिव्या भारतीच्या काकाची मुलगी आहे. तिला चारू अरोरा या नावानेही ओळखले जाते. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेतले.कायनातचे शालेय शिक्षण देहरादून येथे झाले. पुढे पदवीचे शिक्षण तिने दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये केले. कायनात कॅडबरी, मारुती या ब्रॅण्डसह लक्सच्या ब्रॅण्डची जाहिरात करताना बघावयास मिळाली.लहानपणापासूनच कायनातला अभिनेत्री बनायचे होते. तिने बराच काळ मॉडलिंग केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली.कायनातने तामीळ चित्रपटांमध्येही काम केले. २०११ मध्ये आलेल्या ‘मनकथा’ आणि रामगोपाल वर्माच्या ‘सीक्रेट’ या चित्रपटात तिने काम केले.