काल परवाच यो यो हनी सिंगचे ‘चोरी साडा’ हे गाणे रिलीज झाले. हनीने twitterवर याची माहिती दिली होती. प्रतीक्षा संपलीय, हिंदी फ्युजनसह माझे भांगडा सॉन्ग आलेय, असे हनीने लिहिले होते.
एक काळ असा होता, जेव्हा सर्वांच्याच ओठांवर यो योची गाणी होती. पण यशाच्या शिखरावर असतानाच यो यो अचानक गायब झाला. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते. बॉलिवूडमधून काही काळ मी गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती. यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते. बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनी सिंग मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते.
ALSO READ : बायोपिकसाठी यो यो हनी सिंगला मिळाली इतक्या कोटींची आॅफर!