चित्रपटाची कथा महत्त्वाची -शाहरुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:18 IST
शाहरूखने त्याच्या वाढदिवसाला घोषणा केली होती की आगामी वर्षात तो एक नाही तर तब्बल तीन चित्रपटांमध्ये काम करणार आहे. ...
चित्रपटाची कथा महत्त्वाची -शाहरुख
शाहरूखने त्याच्या वाढदिवसाला घोषणा केली होती की आगामी वर्षात तो एक नाही तर तब्बल तीन चित्रपटांमध्ये काम करणार आहे. कदाचित हे तीनही चित्रपट तो रोहीत शेट्टी सोबतच करू शकतो, असे संकेतही त्याने चाहत्यांना दिले आहेत. चित्रपटाची कहाणी चांगली असणे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे त्याने सांगितले. चित्रपट स्वीकारताना आपण कोणती अभिनेत्री आपली सहकलाकार होणार हे पाहात नसून चित्रपटाची कथा कोणती आहे आणि दिग्दर्शक कोण आहे, याला जास्त महत्त्व देत असल्याचे त्याने सांगितले.