स्टार्सचे व्हॅलेंटाईन प्लॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 08:04 IST
व्हॅलेंटाईन डे म्हणजे सर्व प्रेमीयुगुलांचा आवडता दिवस. आपण किती प्रेम करतो हे सांगण्याचा हा दिवस.आपल्या प्रियकर/प्रेयसीसोबत हा दिवस ...
स्टार्सचे व्हॅलेंटाईन प्लॅन्स
व्हॅलेंटाईन डे म्हणजे सर्व प्रेमीयुगुलांचा आवडता दिवस. आपण किती प्रेम करतो हे सांगण्याचा हा दिवस.आपल्या प्रियकर/प्रेयसीसोबत हा दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याचा प्लॅन्स सर्व तरुणाई करीत असते. यामध्ये आपले आवडते बॉलीवूड स्टार्सही अपवाद नाहीत.रणवीरसिंग तर टोरँटोला पोहोचलासुद्धा! दुर्दैवाने रणबीर-कॅटचा व्हॅलेंटाईन डे पुरता वाया गेला. दोघांच्या बे्रक अपमुळे दोघांचा या दिवशी काहीच प्लॅन नव्हता. रणबीरने तर कॅटरिनाला सोडून जग्गा जासूसची शुटिंग सुरू केली; पण इतर स्टार्सनी जोरदार तयारी केली आहे. ती अशी - १. रणवीर सिंग दीपिकाचा विरह एक दिवसही रणवीरला सहन होत नाही. मग हा पठ्ठा व्हॅलेंटाईन डे रोजी एकटा कसा राहणार? दीपिकाला सरप्राईज देण्यासाठी टोरँटोला हजर झाला. आपल्या बॉयफ्रेंडला पाहून दीपिकाला आश्चर्याचा धक्का बसला. रणवीर-दीपिकाने नेहमीच ‘खुल्लमखुल्ला प्यार करेंगे’ असे धोरण अवलंबलेले आहे.२. शाहिद कपूर बॉलीवूड चॉकलेट हीरो शाहिद कपूरचा लग्नानंतरचा हा पहिलाचा व्हॅलेंटाईन डे आहे. म्हणून एक्स्ट्रा स्पेशल साजरा करण्यासाठी तो पत्नी मीरासोबत रोमॅण्टिक डिनरला जाणार आहे. मीरासाठी त्याने सरप्राईज गिफ्टदेखील घेतले आहे. संपूर्ण दिवस तो दोघांसाठीच राखीव ठेवणार आहे.3. सेराह जेन डियाज् गेल्या वर्षी सेराह जेन डियाज्ने फिजी बेटांवर व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. ती म्हणते, मी खूप रोमॅण्टिक आहे; मात्र यावर्षी ‘झुबान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला मोकळा वेळ मिळणार नाही; पण व्हॅलेंटाईन डे नेहमीच स्पेशल राहिलेला आहे.4. सनी लियोन सनी लियोन सध्या तिच्या पतीसोबत लॉस एंजिलिसमध्ये आहे. तिथेच दोघे व्हेलेंटाईन दिवस साजरा करणार आहेत. दरवर्षी काही तरी भन्नाट करण्याचा दोघांचा आग्रह असतो. एके वर्षी त्यांनी विमानातून पॅराशूट घालून उडी मारली, एके वेळी रेस कारमध्ये सुुसाट ड्राईव्ह केली. यावेळी आम्ही असे काही तरी अॅडव्हेंचरस् करणार असल्याचे सनीने सांगितले.