Join us  

रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले होते ‘हे’ स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 2:44 PM

एखाद्या व्यक्तीला त्याचे करिअर आणि बॉलिवूड तसेच टीव्ही जगतात स्थान निर्माण करण्यासाठी रिअ‍ॅलिटी शो एक मोठे माध्यम आहे. श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, दिनेश सर आणि आयुष्मान खुराना सारखे स्टार्स आपल्याला वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोजद्वाराच मिळाले आहेत. मात्र या सर्वांसाठी रिअ‍ॅलिटी शोजमध्ये जागा मिळविणे सोपे नव्हते. कारण बरेच स्टार रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले होते. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत...

-रवींद्र मोरेएखाद्या व्यक्तीला त्याचे करिअर आणि बॉलिवूड तसेच टीव्ही जगतात स्थान निर्माण करण्यासाठी रिअ‍ॅलिटी शो एक मोठे माध्यम आहे. श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, दिनेश सर आणि आयुष्मान खुराना सारखे स्टार्स आपल्याला वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोजद्वाराच मिळाले आहेत. मात्र या सर्वांसाठी रिअ‍ॅलिटी शोजमध्ये जागा मिळविणे सोपे नव्हते. कारण बरेच स्टार रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले होते. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत...* सान्या मल्होत्राया दंगल अ‍ॅक्ट्रेसने बॉलिवूड चित्रपटात आपला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवून वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सान्या अभिनेत्री होण्यासोबतच मोठी डान्सरही आहे, मात्र या अगोदर तिला एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये रिजेक्ट करण्यात आले होते. त्यानंतर मात्र तिने अथक प्रयत्न केले. या शो द्वारे अनेक डान्सर्सना कोरिओग्राफर म्हणून बॉलिवूडमध्ये काम मिळाले आहे. सान्या या शोच्या टॉप १०० स्पर्धकांमध्ये सहभागी होती, मात्र तिला यासाठी रिजेक्ट करण्यात आले होते की, तिच्या आयुष्याच्या कथेत दम नव्हता. या रिजेक्शनचा फायदा सान्याला तेव्हा झाला जेव्हा ती मुंबई आली आणि तिने यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत केली.* राजकुमार रावअत्यंत कमी कालावधीत राजकुमार रावने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे मन जिंकले आहे. राजकुमार रावने सुरुवातीला लहान लहान भूमिका साकरल्या होत्या आणि आता मात्र त्याने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दिग्गज स्टार त्याच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहे. मात्र चित्रपटात काम करण्याअगोदर १६ व्या वर्षी जेव्हा राजकुमार एका डान्स रिअ‍ॅलिटी शोचे आॅडिशन देण्यासाठी मुंबई आला होता तेव्हा त्याला रिजेक्ट करण्यात आले होते. राजकुमारने त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, त्याला डान्सर बनण्याची इच्छा होती आणि तो त्यावेळचा सर्वात हिट रिअ‍ॅलिटी शोसाठी ऑडिशन देण्यासाठी गेला होता. त्या शोमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर तो खूपच डिस्टर्ब झाला होता, मात्र आता त्याला या गोष्टीचा आनंद आहे की, त्याला चांगले करिअर निवडण्याची संधी मिळाली.* कपिल शर्माया दिग्गज कॉमेडियनने बऱ्याचदा आपल्या सिंगिंग टॅलेंटचे जगासमोर सादरीकरण केले आहे, मात्र कॉमेडीमध्ये पदार्पण करण्याअगोदर एका रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये कपिल रिजेक्ट झाला होता. काही वर्षांपूर्वी जेव्हा कपिल एका शोच्या सेटवर आपल्या शोचे प्रमोशन करण्यासाठी आला तेव्हा त्याने विचार केला होता की, त्याला या शोच्या जजेस समोर गाणे गाण्याची संधी मिळेल, मात्र तो त्याला अगोदरच रिजेक्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या शोमुळे कपिलला ओळख मिळाली, त्याचे करिअर बनले त्या शोनेही कपिलला पहिल्यांदा रिजेक्ट केले होते. नंतर तो पुन्हा गेला आणि त्याचे सिलेक्शन झाले.* आयुषमान खुरानाबॉलिवूडमध्यरे आयुष्यमानचे आजचे स्थान पाहता त्याला जणू अ‍ॅक्टिंगमध्येच करिअर करायचे होते. टीव्हीच्या एकमेव एका अ‍ॅक्टिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याने एकदा ऑडिशन दिले होते. मात्र तो त्यात रिजेक्ट झाला होता. रिजेक्ट झाल्यानंतर तो एका मालिकेच्या सीजन 2 मध्ये गेला होता. आयुष्यमानने या गोष्टीबाबत तेव्हा सांगितले जेव्हा तो याच शोच्या सेटवर एक स्टार आणि गेस्ट म्हणून गेला होता.* रघु रामआपण सर्वांनी एका बहुचर्चित मालिकेत रघुला सर्व स्पर्धकांचे बऱ्याच वर्षासाठी जीवन कठीण करताना पाहिले आहे आणि आपण हा कधी विचार केला नसेल की रघुने स्वत:ही कधी एखाद्या शोचे ऑडिशन दिले असेल. रघु २००४ मध्ये एका रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्या सीजनमध्ये ऑडिशनसाठी गेला होता आणि तिथे सोनू निगम, फराह खान आणि अनु मलिक यांनी त्याला रिजेक्ट केले होते.

टॅग्स :बॉलिवूडकपिल शर्मा सान्या मल्होत्रारघु रामराजकुमार राव