अयशस्वी ठरलेले स्टार पुत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 05:49 IST
जेव्हा आपण बॉलीवूडमधील स्टारपुत्रांची माहिती घेतो, त्यावेळी आपणास त्यांच्याविषयी मत्सर निर्माण होतो. आपल्या दृष्टीने त्यांच्याइतके नशीब घेऊन कोणीही जन्माला ...
अयशस्वी ठरलेले स्टार पुत्र
जेव्हा आपण बॉलीवूडमधील स्टारपुत्रांची माहिती घेतो, त्यावेळी आपणास त्यांच्याविषयी मत्सर निर्माण होतो. आपल्या दृष्टीने त्यांच्याइतके नशीब घेऊन कोणीही जन्माला आलेले नाही. एकाच रात्रीत स्टार होण्याची संधी या पुत्रांना मिळत असते. ते कायम बॉलीवूडमध्ये चमकत असतात. मात्र बºयाचवेळा हे खरेही नसते. स्टारपुत्राच्या पोटी जन्माला येऊनही अपयशी ठरलेले अनेक मुले आहेत. अशांविषयी माहिती देत आहोत...लव्ह सिन्हा‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांचा हा सुपुत्र. शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट निर्माण केले. त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाने ‘दबंग’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. तिनेही मोठी कामगिरी बजावली. मात्र त्यांचा सुपुत्र लव्ह सिन्हाला कोणी ओळखत नाही. २०१० साली त्याने ‘सदियां’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. हा त्याचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.फरदीन खानबहुगुणी कलाकार फिरोज खान यांचा मुलगा. फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॅलेंट असतानाही त्याला झगडावे लागले. ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र त्याला यश आले नाही. लव्ह के लिए कुछ भी करेगा, जंगल, प्यार तुने किया क्या, ओम जय जगदीश आणि अॅसीड फॅक्टरी हे त्याचे चित्रपट जे साफ आपटले.सिकंदर खेरअनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा. आईवडील दोघेही चांगले कलाकार असताना सिकंदरकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. लोेकांमध्ये आपली छाप सोडण्यास सिकंदर हा अपयशी ठरला. ‘प्लेअर्स’ंद्वारा तो चित्रपटात आला. त्याला फारसे यश मिळाले नाही.जॅकी भगनानीवाशू भगनानी सारखा मोठा निर्माता असताना देखील मुलगा जॅकी फारसे यश मिळवू शकला नाही. कल किसने देखा आणि फालतू हे चित्रपट चालले नाहीत. त्याची कारकीर्द ही अपयशी ठरली. आयफा बेस्ट डेब्यू अॅवार्ड मिळाले असतानाही तो पुढे येऊ शकला नाही.अध्ययन सुमनशेखर सुमनचा हा मुलगा. शेखर सुमन यांच्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्याल फिल्मफेअरच्या बेस्ट डेब्युटंट अॅवार्डसाठी नॉमिनेशन मिळाले होते. दिसायला छानसा आणि कंगना राणावतचा मित्र हीच त्याची ओळख ठरली.हरमन बावेजात्याचा पहिलाच चित्रपट लव्ह स्टोरी २०५० हा आपटल्यानंतर हरमन हा प्रियंका चोप्रासोबत असणाºया संबंधानी सर्वांसमोर आला होता. हॅरी बावेजा या दिग्दर्शकाचा आणि पम्मी बावेजा या निर्मातीचा मुलगा. त्याने आणखी दोन चित्रपट केले. दोन्ही अपयशी ठरले.इशा देओलहेमा मालिनीची मुलगी असूनही ती फारशी यश कमवू शकली नाही. आईसारखी अपेक्षा ठेवल्याने ती अपयशी ठरल्याचे सांगण्यात येते. कोई मेरे दिलसे पुछे या चित्रपटात बेस्ट डेब्यू अॅवॉर्ड मिळविला असला तरी पुढे चमकू शकली नाही.तनिशा मुखर्जीआई तनुजा मुखर्जी आणि बहीण काजोल यांच्या आशीर्वादाने ती चित्रपट सृष्टीत आली. श...श...श, नील एन निक्की, पॉपकॉर्न खाओ मस्त हो जावो, वन टू थ्री असे चित्रपट केले. मात्र पुढे ती काही करु शकली नाही.